कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गनगरीत बांधकाम कामगारांचे “आक्रोश” आंदोलन.

*🛑सिंधुदुर्गनगरीत बांधकाम कामगारांचे “आक्रोश” आंदोलन.*

 

*🛑दीड वर्ष प्रलंबित राहिलेल्या लाभाच्या प्रस्तावांबाबत कामगार संघटनांची आक्रमक भूमिका.*

 

*🛑अखेर गणेश चतुर्थीपूर्वी 7500 अर्ज निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर कृती समितीचे आंदोलन स्थगित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०४:-*

आज मंगळवार दि 4 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र येत “आक्रोश” आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर, श्रमिक कामगार संघटनेचे प्राजक्त चव्हाण, कोंकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे संतोष तेली, बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेचे बाबल नांदोसकर वं अनिल कदम आणि निवारा बांधकाम कामगार संघटनेचे मंगेश चव्हाण,सतीश कदम,संजय सावंत,महेश ढवळे, एकनाथ नेरूरकर, अरविंद सावंत, मंगेश नारीनग्रेकर यांसह साडेतीनशे ते चारशे कामगार उपस्थित होते.मागील दीड वर्षांपासून जवळपास साडे चौदाहजार प्रलंबित राहिलेल्या लाभाच्या प्रस्तावांपैकी पुढील दीड महिन्यात गणेश चतुर्थीपर्यंत 7500 अर्ज निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले.दरम्यान स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या विविध समस्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यानंतर नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज जलद गतीने निकाली काढण्यात येतील, किट वितरण प्रक्रिया सुलभ व कामगारांना सोयीस्कर व्हावे यासाठी वितरण एजन्सी सोबत समन्वय साधून संघटनांना विश्वासात घेऊन वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व आरोग्य तपासणी योजनेच्या बाबतीत असलेल्या अनियमित्तांची योग्य चौकशी केली जाईल असे लेखी आश्वासन कामगार अधिकारी खांडेकर यांनी बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर करण्यात केले. सकाळी 11 च्या सुमारास शेकडो कामगारांचा जमाव अनपेक्षितपणे जमून कामगार अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यासाठी जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिंधुदुर्गनगरी पोलीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेखर लव्हे यांनी मध्यस्ती करत आंदोलकांना स्टेट बँक इंडिया समोरील पटांगणात थांबण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर व दुकानें निरीक्षक रविराज हुंबे यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. गणेश चतुर्थी पूर्वी कामगारांचे लाभ प्रस्ताव मंजूर करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!