🛑३० हजार भाडे देण्याची तयारी, तरी १२०० रुपयांत गाळेपट्टे?’;
*🛑३० हजार भाडे देण्याची तयारी, तरी १२०० रुपयांत गाळेपट्टे?’;*
*🛑सावंतवाडी नगरपरिषदेवर भ्रष्टाचाराचा स्फोटक आरोप, १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा!*
*🛑एकाच व्यक्तीकडे ९ हून अधिक गाळे, सहा वर्षांचे थकीत भाडे, पोटभाड्याचा आरोप;*
*🛑अधिकाऱ्यांकडे लाचखोरीचे व्हिडिओ असल्याचा दावा,मोठ्या पडद्यावर पुरावे दाखवण्याची घोषणा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* सावंतवाडी नगरपरिषदेतील गाळेपट्टा व्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रेयस साईनाथ मुंज यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि नियमबाह्य गाळेपट्टा नूतनीकरणाचे गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच राज्य सरकारकडे निवेदन सादर करून, मागण्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंज यांनी निवेदनात दावा केला आहे की, नगरपरिषदेच्या मालकीचे एकाच व्यक्तीने नऊपेक्षा अधिक गाळे ताब्यात ठेवले असून, अनेक वर्षांचे भाडे थकीत आहे. तसेच गाळे परस्पर पोटभाड्याने देऊन मूळ करारातील अटींचा भंग करण्यात आला असूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
याचबरोबर, “मी दरमहा ३० हजार रुपये भाडे देण्यास तयार असतानाही नगरपरिषद केवळ १२०० रुपयांची भाडेवाढ करून पुनर्लिलाव न करता गाळेपट्टे करण्याच्या तयारीत आहे,” असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवेदनात नगरपरिषदेतील काही अधिकाऱ्यांवर कमिशनखोरी, लाच स्वीकारणे, बिल्डरांसोबत संगनमत अशा स्वरूपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून पैसे घेतानाचे तसेच बिल्डरांसोबतचे व्हिडिओ व छायाचित्रे आपल्याकडे असल्याचा दावा करत, उपोषणस्थळी मोठ्या एलईडी स्क्रीनवर हे पुरावे जनतेसमोर सादर करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा त्या विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या कार्यालयासमोरही आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, नगरपरिषदेकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित गाळेधारकांनी करारातील अटींचा भंग केल्याचा दावा करत, अशा गाळ्यांचे नूतनीकरण कायद्याने करता येणार नसल्याचेही मुंज यांनी नमूद केले आहे.
मात्र, या सर्व आरोपांवर सावंतवाडी नगरपरिषद किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आरोपांची सत्यता सक्षम यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

