कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑धाकोरे वसवाचे तळे शाळेत रानभाजी प्रदर्शन व कृषी मार्गदर्शन उपक्रम.

*🛑धाकोरे वसवाचे तळे शाळेत रानभाजी प्रदर्शन व कृषी मार्गदर्शन उपक्रम.*

 

*🛑ज्येष्ठ नागरिक भाऊ पालव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* आजगाव येथील वसवाचे तळे शाळेत विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी रानभाजी प्रदर्शन व कृषी मार्गदर्शन कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर, ग्रामपंचायत अधिकारी नितीन परब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती पालव, मुख्याध्यापक अर्जुन रणशूर, शिक्षक प्रशांत परब, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव, ज्येष्ठ शिक्षणप्रेमी अर्जुन (भाऊ) पालव तसेच शिक्षणतज्ज्ञ महादेव कापडी उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक अर्जुन (भाऊ) पालव यांनी परिसरातील विविध रानभाज्यांची सविस्तर माहिती देत त्यांचे पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म आणि दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थितांनी लाभ घेतला.

केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर यांनी शाळेच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व विषद केले. पारंपरिक आणि पोषक आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध रानभाज्या गोळा करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविले तसेच विक्रीही केली. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत रानभाज्यांची खरेदी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती, पर्यावरण आणि स्थानिक जैवविविधतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अर्जुन रणशूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रशांत परब यांनी मानले.

यावेळी सुंदर गावडे, प्रकाश परब, शितल नाईक, लक्ष्मी पालव, सुजाता कापडी, सुनंदा परब, राजश्री गावडे ,सिया गावडे, उज्वला परब तनुजा कोळेकर, सानिका परब ,ताई परब, रंजना कापडी ,सुप्रिया गावडे, नीलिमा गावडे ,सुलोचना गावडे ,श्रीम.कोळेकर ,दुर्वा धुरी तसेच बचत गटाच्या सुशांती आरोंदेकर,अमृता गावडे,पूजा चराटकर,सचिन परब ,सुनीता परब तसेच अंगणवाडी सेविका देविका गोवेकर,पूजा कोठावळे,ग्रामपंचायत कर्मचारी सुहास साटेलकर,प्रमोद दाभोलकर आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!