🛑वाघेरी वनक्षेत्रात हरित क्रांतीचा संकल्प; २५५ वृक्षरोपांनी फुलला जागतिक निसर्ग संवर्धन दिन!
*🛑वाघेरी वनक्षेत्रात हरित क्रांतीचा संकल्प; २५५ वृक्षरोपांनी फुलला जागतिक निसर्ग संवर्धन दिन!*
*🛑सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशन, मातोंडचा ‘निसर्ग संवर्धन – एक मिशन २०२६’ उपक्रम; लोकसहभागातून पर्यावरण रक्षणाचा निर्धार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०३:-* जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधत सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशन (रजि.), मातोंड यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘निसर्ग संवर्धन – एक मिशन २०२६’ या उपक्रमांतर्गत मौजे तुळस येथील वाघेरी वनक्षेत्रात तब्बल २५५ विविध प्रकारच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पावसाच्या आल्हाददायक वातावरणात झालेल्या या उपक्रमाने पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.
या वृक्षारोपण मोहिमेत पिंपळ, औदुंबर, खैर, जांभूळ, कोकम, काजू आणि आंबा यांसारख्या पर्यावरणपूरक व उपयुक्त वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. उपस्थित सर्व निसर्गप्रेमींनी वृक्षसंवर्धनाचा दृढ संकल्प करत “वृक्ष लावा… पर्यावरण वाचवा…” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ तसेच तुळस येथील समाजसेवक विजय रेडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी वृक्षलागवडीसोबतच वृक्षांचे संगोपन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष कृष्णा चंद्रकांत परब, सचिव सुरेंद्र परब, संस्थापक रमेश गावडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या मोहिमेसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य केले, तर भोजन व व्यवस्थापनासाठीही स्थानिक नागरिकांनी मोलाचे योगदान दिले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती आणि निसर्गप्रेमींचे सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“आज लावलेले प्रत्येक रोप म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार जीवनाची भेट,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

