कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾अखेर मूळस-हेवाळे पूल दुरूस्तीचे काम पूर्ण..

 

◾सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी मानले सहकार्य केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२४-: मूळस-हेवाळे पूल दुरूस्ती व्हावा यासाठी तेथील नागरिकांनी अनेक उपोषणे केली. अखेर त्यांच्या या उपोषणांना यश आले.

सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई व त्यांच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांनी या पुलासाठी अतोनात प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले.

पाटबंधारे विभागाचे आजगेकर यांनी होळी पूर्वी काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले होते त्या प्रमाणे त्यांनी ते करून दाखवले व त्यात महत्त्वाची भूमिका घेत हे काम पूर्णत्वास आणले त्यांचे गावाच्या वतीने आभारी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी सांगितले.

तसेच हेवाळे गावचे नवनिर्वाचित सरपंच साक्षी देसाई व त्यांच्या सोबत काम करत असलेल्या उपसरपंच, सदस्य व गावच्या ग्रामस्थांचे सहकार्य असल्यामुळे हे काम योग्य पाठपुरावा करून पूर्ण झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!