आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 एलपीजी पुरवठ्याचा खोळंबा थांबवा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

🛑 गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण ग्राहकांना दिलासा द्या; बीएसएनएल नेटवर्क व ओटीपी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची संतोष मोर्ये यांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग, दि-३१:- ग्रामीण भागातील नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा सुरळीत पुरवठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे सेनेचे कोनाळ विभाग प्रमुख तथा मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्ये यांनी प्रशासनाला दिला आहे.

सध्या घरगुती एलपीजी रिफिलसाठी दोन सिलेंडरमधील ४५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या खराब असल्याने वीजपुरवठा खंडित होताच टॉवर बंद पडतात आणि संपूर्ण नेटवर्क व्यवस्था कोलमडते.

मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी तसेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) प्राप्त होत नाही. परिणामी गॅस वितरकांना नियमानुसार सिलेंडरचे वितरण करता येत नसल्याने अनेक ग्राहकांना गॅसपासून वंचित राहावे लागत आहे.

येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, गोवा आणि इतर शहरांतील मोठ्या संख्येने चाकरमानी गावी परतणार असल्याने घरगुती गॅसची मागणी लक्षणीय वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन रिफिल सिलेंडरमधील ४५ दिवसांचा कालावधी कमी करून पूर्ववत करावा, तसेच नेटवर्क समस्याग्रस्त गावांमध्ये ओटीपी व DAC सक्ती तात्पुरती शिथिल करून पर्यायी पडताळणीच्या माध्यमातून गॅस वितरणास परवानगी द्यावी, अशी मागणी संतोष मोर्ये यांनी केली आहे.

याशिवाय, ज्या गावांतील बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्या निकामी झाल्या आहेत त्या तातडीने बदलाव्यात, जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही मोबाईल सेवा सुरू राहील. त्यामुळे नागरिकांना गॅस वितरणाबरोबरच शासकीय, बँकिंग आणि इतर ऑनलाइन सेवांचा लाभ अखंडितपणे मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय न घेतल्यास नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही संतोष मोर्ये यांनी दिला.

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!