🛑ईसीजी टेक्निशियनअभावी रुग्णांची गैरसोय.
*🛑ईसीजी टेक्निशियनअभावी रुग्णांची गैरसोय.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ३०:-* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात अनेक तांत्रिक पदे अद्याप रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. विशेषतः ईसीजी विभागात स्वतंत्र टेक्निशियन नसल्याने दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा रुग्णालयातील ईसीजी टेक्निशियन गेल्या महिनाभरापासून रजेवर आहेत. मात्र, त्यांच्या जागी जिल्हा रुग्णालयाकडून पर्यायी कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. शिवाय, वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतंत्र ईसीजी टेक्निशियनची नियुक्ती केली नाही. त्यामुळे ईसीजी तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असून अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णांना जिल्ह्यातच अद्ययावत आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, काही तज्ज्ञ डॉक्टर, टेक्निशियन व अन्य आवश्यक पदे रिक्त असल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी गोवा किंवा इतर ठिकाणी जावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरातही मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले होते, मात्र, काही तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सर्व रुग्णांची वेळेत तपासणी होऊ शकली नसल्याचे सांगितले जाते. विशेषतः ईसीजी विभागात दररोज ५० हून अधिक रुग्ण येत असतानाही कायमस्वरूपी टेक्निशियन उपलब्ध नसल्याने रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्या नियंत्रणाखाली काही रिक्त पदांची भरती करण्यात आली असली, तरी ईसीजीसह अन्य महत्त्वाच्या तांत्रिक विभागांतील रिक्त पदे अद्याप भरलेली नाहीत, अशी माहिती पुढे येत आहे.
त्यामुळे या विभागांमध्ये तातडीने पात्र टेक्निशियनची नियुक्ती करून रुग्णांना दर्जेदार व अखंड सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
याबाबत काही रुग्णांनी पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय
प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

