🛑मळगाव येथील श्री पद्धतीने भात लागवड प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
*🛑मळगाव येथील श्री पद्धतीने भात लागवड प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.*
*🛑कल्पवृक्ष शेतकरी गट व भारतीय किसान संघ सिंधुदुर्गचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* कल्पवृक्ष शेतकरी गट व भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने (शनिवार २५ रोजी) मळगाव येथील रामकृष्ण पंतवालावलकर यांच्या निवासस्थानी श्री पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पार पडले. या प्रशिक्षणाचा ४८ महिला व पुरुष शेतकरऱ्यांनी लाभ घेतला.
किसान असतील भाग्यविधाते आगामी शत-शतकांचे या गाण्याने ( पद्याने ) कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कल्पवृक्ष शेतकरी गट अध्यक्ष संतोष सामंत यांनी प्रास्ताविकामध्ये गट स्थापनेपासून विविध शेती व ग्रामविकासाच्या दृष्टीने गटाने केलेले काम सर्वासमोर मांडले. धनंजय गोलम यांनी भारतीय किसान संघाच्या स्थापनेचा उद्देश, आतापर्यत केलेले काम, जिल्ह्यात सध्यस्थितीत करत असलेल्या कामाची माहिती दिली. आबा वराडकर यांनी श्री पद्धतीने भात लागवड कशी करावी त्याची आवश्यकता व कालवीमध्ये ९०% शेती पद्धतीने लागवडीचे तंत्र विकसीत कसे झाले याची सविस्तर माहिती दिली. अश्विनीकुमार मांजरेकर यांनी गो-कृपाअमृत महत्व, वापर कसा करावा हे सांगून आपल्या शेतात झालेले सकारात्मक परिणाम विषद केले. त्यांनी श्री पद्धतीने भात लागवडीसाठी केलेल्या मार्करची माहिती सर्वांना दिली. कार्यक्रमाला सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी तानाजी सावंत व अभय भिडे यांनी शुभेच्छा दिल्या. रामकृष्ण पंतवालावलकर यांनी शेती आवश्यकता, भातशेतीचे तंत्र, गावाच्या विकासासाठी तसेच शेती टिकण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे सदकार्य का आवश्यक आहे याचे महत्व सांगून आभार प्रदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्ष शेतात उप कृषी अधिकारी यशवंत गवाणे, आबा वराडकर व अश्विनीकुमार मांजरेकर यांनी रोपवाटीका कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. शेतकऱ्यांनी दोरीवर व मार्करवर श्री पद्धतीने भात लागवड करत वर्षी मळगावमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने भात लागवड करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमाला डॉ. हेडगेवार प्रकल्याच्यावतीने कार्यवाह हेमंत मसूरकर व एकनाथ सावंत उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

