आणखीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा मेळावा उत्साहात

🖥️ Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग : दि. २३ जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा सहकुटुंब मेळावा येथील राणे कृषी पर्यटन केंद्रात उत्साहात पार पडला पत्रकार यांनी एकत्र येऊन काम करीत असतात परंतु एका पत्रकार यांच्या कुटुंबियांची ओळख दुसऱ्या पत्रकार यांच्या कुटुंबीयांशी नसते ही ओळख व्हावी पत्रकार यांच्याबरोबर यांचे कुटुंबही एकसंघ रहावे यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता काही कुटुंबीयांच्या पत्रकारांच्या कुटुंबियांशी एकमेकांशी ओळख होती अनेकांना ऐकून माहीत होते मात्र स्नेहमेळावा निमित्ताने सर्वांनी सर्वांची पक्की ओळख होण्यास मदत झाली. सर्व कुटुंबीय एकमेकात मिसळली होती यानिमित्त मुलांनी एकत्र येत डान्स केला . त्यानंतर सर्व पत्रकार मित्रांनी आपापल्या एकत्र येत असलेली कला सादर केले यापूर्वी पत्रकार मित्रांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांपैकी काही महिलांनी अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करीत आपली पत्नी व मुले यांचा यांना सामावून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केली यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे उपाध्यक्ष बाळ खडपकर सहसचिव देवयानी ओरोसकर मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर सचिव नंदकुमार आयरे उपाध्यक्ष लवू महाडेश्वर माजी अध्यक्ष संदीप गावडे सहसचिव सतीश हरमलकर खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

बंदिस्त हॉटेलमध्ये आनंद साजरा करण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जास्त आनंद खुल्या वातावरणात साजरा करण्याचा निर्णय मुख्यालय पत्रकार संघाने घेतला होता.

यावेळी बोलताना गणेश जेठे यांनी उपस्थित कुटुंबीयांना उद्देशून तुम्ही पत्रकारांच्या फॅमिली आहात हे तुमचे भाग्य आहे. कारण पत्रकार समाजसेवेचे व्रत घेतलेले असतात. त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या कुटुंबाला सुखी ठेव तील असे नाही. परंतु यांना समाजात मिळणारा मान तुमचाही स्वाभिमान उंचावणारा असतो. त्यामुळे तुम्ही भाग्यवान असल्याचे सांगितले. नूतन अध्यक्ष संजय वालावलकर यांनी मुख्यालय पत्रकार संघ यापुढेही कार्यक्रम आयोजित करीत कुटुंबीयांना सहभागी करून घेतले जाईल असं सांगितलं .मावळते अध्यक्ष संदीप गावडे यांनी गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबविण्याचा विचार आमच्या मनात होता आज तो प्रत्यक्षात उतरला असे सांगितले. यावेळी बाळ खडपकर देवयानी ओरोसकर यांनी विचार मांडले . मुख्यालय पत्रकारांनी कुटुंबीयांनी एक वेगळा दिवस उपभोगला स्नेहा भोजनाने या मेळाव्याचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!