🛑गणेश चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्याची लगबग सुरू.
*🛑गणेश चित्रशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्याची लगबग सुरू.*
*🛑महागाईचे सावट कलाकारांसह ग्राहकांवरही.*
*🛑पी. ओ. पी. च्या जमान्यातही पारंपारिक मूर्ती कलाकार आपली कला जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-* गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सगळीकडे पारंपरिक गणेश चित्रशाळांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश मूर्तीकार सध्या विविध आकार, रुपातील आणि आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारण्यात दिवसरात्र व्यस्त झाले आहेत.
कलाकारांच्या कुशल हातातून साकारत असलेल्या देखण्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
यंदा मात्र वाढत्या महागाईचा फटका गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला आहे. शाडू माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च ,मजुरी तसेच इतर कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे मूर्ती तयार करण्याच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीकारांबरोबरच ग्राहकांनाही अधिक आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
महागाईमुळे उत्पादन खर्च वाढला असला तरी गणेशभक्तांच्या श्रद्धेत कोणतीही कमी झालेली नाही. पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना यंदाही चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवासाठी वेळेत मूर्ती तयार करून भाविकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी गणेश मूर्ती चित्रशाळांमध्ये सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
चित्र शाळेत मूर्ती कलाकारांची कला पाहण्यासाठी तसेच आपल्या आवडीच्या गणेश मूर्ती बनविण्यास सांगण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
पी.ओ.पी च्या रेडीमेड गणेश मूर्ती मुळे जो हाडाचा पारंपारिक मूर्ती कलाकार आहे त्याच्या कलेला काही प्रमाणात धोका निर्माण झाल्याचे येथील मूर्ती कलाकारांनी सांगितले.
पी.ओ.पी. च्या रेडीमेड आणि साच्यातून तयार होणाऱ्या मूर्तींमुळे पारंपारिक पद्धतीने मातीकाम करणाऱ्या मूर्तिकारांच्या कलेवर परिणाम होत असून त्यांच्या उपजीविकेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे पारंपारिक कलाकारांची ही चिंता अत्यंत रास्त आहे.
सध्या साच्यांच्या साहाय्याने पी.ओ.पी. च्या शेकडो रेडीमेड मूर्ती मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्यामुळे या रेडीमेड मूर्ती बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या जात आहे.
पी.ओ. पी .मुळे आपली पारंपारिक पद्धतीने मूर्ती घडविण्याची कला मागे पडत चालली आहे. तरी पण काही पारंपारिक पद्धतीने तयार करणाऱ्या गणेश चित्र शाळा आपली पारंपारिक कला टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रत्येक कलाकाराची गणेश मूर्ती घडविण्याची एक स्वतंत्र शैली असते, परंतु रेडीमेड संस्कृतीमुळे बाजारात सर्व मूर्ती एकाच साच्याच्या दिसू लागल्या आहेत.
पी. ओ. पी. च्या जमान्यातही पारंपारिक मूर्ती साठी ग्राहकांची आग्रही मागणी होत असल्याचे दिसते.
सध्या पी.ओ.पी. मुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन नागरिक पुन्हा एकदा जागृत होऊन पारंपारिक म्हणजे चिकणमाती, शाडूमातीची पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची मागणी करू लागले आहेत, ज्यामुळे हाताने काम करणाऱ्या मूळ कलाकारांना पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

