◾ दोडामार्ग तालुक्यातील मुख्य रस्ते १५ एप्रिल पर्यंत दुरुस्त न झाल्यास दोडामार्ग जनआक्रोश चा ठिय्या आंदोलनाचा इशारा..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-२२:- दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्ते डांबरीकरण व दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयाचा प्रश्न १५ एप्रिल पर्यत मार्गी न लागल्यास सावंतवाडी बांधकाम कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आज दोडामार्ग जन आक्रोश तर्फे तहसीलदार कार्यालयात निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले, गेली आठ ते दहा वर्षे दोडामार्ग तालुक्यातील बांदा ते आयी, दोडामार्ग ते विजघर रस्त्याची पुर्णतः चाळण झालेली आहे. त्यामुळे ह्या रस्त्यात अनेक अपघात झाले. अपघातामुळे काहींना अपंगत्व आले आहे. ह्या संदर्भात वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आली पण त्या निवेदनास केराची टोपली दाखवण्यात आली. यासाठी तालुक्यातील युवकांनी रस्त्यावर उतरून सुध्दा आंदोलने केली. तसेच आरोग्याचा गंभीर असणारा प्रश्न दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्ह्य रुग्णालय म्हणून २०१३ मंजूर असूनही अद्याप पर्यत जैसे थे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही आमदार, पालकमंत्री यांचे लक्ष नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधीचा लक्ष नाही. ह्यामुळे आज तालुक्यातील युवक व सर्व सामान्य जनता आता हतबल झाली आहे न्याय मागायचा तर कुणाकडे ? आता ना ईलाजाने शासन प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे, कोरोना काळात जिल्ह्यात जमावबंदी असताना आपल्या हक्काच्या जर वरील मागण्या दि. १५ एप्रिल २०२१ पर्यत मान्य होऊन प्रत्यक्ष स्वरूपात कामाला सुरवात न झाल्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात लोकशाही मार्गाने कार्यालय ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी वैभव ईनामदार, महानंद शेटये, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, मनिष सावंत, हरी देसाई, शैलेश नाईक, संदेश गवस उपस्थित होते.

