कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शारदा विद्यालय,मळगाव रस्ता शाळेची बांधावर भरली अनोखी शाळा.

*🛑शारदा विद्यालय,मळगाव रस्ता शाळेची बांधावर भरली अनोखी शाळा.*

 

*🛑बळीराजासाठी एक दिवस’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा अनुभव.*

 

*🛑ट्रॅक्टर चालविण्यापासून भात लावणीपर्यंत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* तालुक्यातील शारदा विद्यालय, मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘बळीराजासाठी एक दिवस’ उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरवत नांगरणी, तरवा काढणी, भात लावणीसह विविध शेतीकामांचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव आणि कृषी संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख झाली.

शालेय विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्धल आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने “बळीराजासाठी एक दिवस” हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जातो. याच उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी मळगाव देऊलवाडी येथील प्रसाद राऊळ यांच्या शेतात जात शेतीचे धडे घेतले. शिक्षक व पालक यांनी मुलांना आधुनिक शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ती कशी चालवावीत याविषयी माहिती दिली. तरवा काढणे, तरव्याच्या पेंड्या बांधणे, ट्रॅक्टर चालविणे, मेर लावणे, भात लावणी करणे, दाता चालविणे आदी शेतीकामांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. त्यानंतर मुलांनी व मुलींनी स्वतः शेतात उतरून ट्रॅक्टर चालविणे, तरवा काढणी आणि भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेत मनमुराद आनंद लुटला.

शाळेचे मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी यांनीही ट्रॅक्टर चालवून तसेच लावणीमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांसमवेत शेतीकामाचा अनुभव घेतला. या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना तेली, उपाध्यक्ष महेश पंतवालावलकर, सदस्य अमित गावकर, शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, गीत गावडे, गजेंद्र गावडे, सर्व सदस्य, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भात लावणीनंतर मुलांना पाव भाजी वाटप करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी यांनी आभार व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!