आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली, जाणवली, वागदे येथील रस्ते देत आहेत अपघाताला आमंत्रण…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनीधी : रविकांत जाधव

 🎴कणकवली : दि. २२ जाणवली नदी पुलाजवळ, मुंबई – गोवा महामार्गावर रस्ता बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.

या रस्त्यांवर सिग्नलचे खांब नाहीत, दोन्ही बाजुला येण्या – जाण्याकरिता रस्त्यांच्या कडेला संरक्षण भिंत किंवा जाळी लावली गेली नसल्यामुळे, लोक गाड्या रस्त्याच्या मधुन घालत आहेत आणि वरुण जाणाऱ्या सुसाट गाड्या त्यांना टक्कर देऊन पुढे जातात. या सर्व गोष्टींमुळे अपघात वाढत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नागरीकांकडुन ‌बोलले जात आहे.

दिलीप बिल्डकॉन या कंपनीला शासनाने ठेका दिला आहे. या ठेकेदाराकडे अधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधी लक्ष देणे गरजेचे आहे.

कणकवली शहर, तसेच जाणवली, वागदे येथे अपघातांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात गरीब आणि मोलमजुरी करून खाणाऱ्यांचेच जास्त प्रमाणात मृत्यू होऊन नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. यावर गंभीर पणे उपाय योजना होणे गरजेचे आहे.

या गोष्टींकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतं असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष्य देत, महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात आणि जनतेचे होत असलेले नुकसान, यात लक्ष घालावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलिस अधिकारी, वाहतुक पोलिस यांनी गाड्यांवर दंड लावणे आणि मास्क न लावणाऱ्यांकडुन पैसे वसुल करणे. नगरपंचायत, स्थानिक प्रशासन यांनी दंड वसुलीची कामे थोडी बाजुला ठेऊन. या अपघाताच्या घटनेकडे लक्ष देणे खुप गरजेचे असल्याचे मत अनेक पादचाऱ्यांनी कोकण लाईव्हशी बोलताना व्यक्त केले.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!