कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑दोडामार्गात विद्यार्थ्यांचा भक्तिरंग! जि. प. केंद्रशाळा क्र. १ तर्फे उत्साहात वारकरी दिंडी.

*🛑दोडामार्गात विद्यार्थ्यांचा भक्तिरंग! जि. प. केंद्रशाळा क्र. १ तर्फे उत्साहात वारकरी दिंडी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २५:-* आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, दोडामार्ग नं. १ यांच्या वतीने आज भव्य आणि उत्साहपूर्ण दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेपासून प्रारंभ झालेली ही दिंडी दोडामार्ग शहरातील प्रमुख बाजारपेठेतून भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, वीणा आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहामुळे दिंडीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

या दिंडीत विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद व सहकार्याचे सुंदर दर्शन या निमित्ताने घडले. बाजारपेठेतील नागरिकांनीही दिंडीचे स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भारतीय संस्कृती आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ व्हावी, तसेच आपल्या संस्कृतीची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून व्हावी या उद्देशाने शाळेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कारमूल्ये जोपासण्याचा संदेश या दिंडीतून प्रभावीपणे देण्यात आला.

दोडामार्ग केंद्रशाळा नं. १ ही शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मूल्याधिष्ठित उपक्रम राबविणारी शाळा म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दिंडीने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या मनावर भक्ती, संस्कार आणि एकात्मतेची अविस्मरणीय छाप उमटविली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!