🛑बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रस्तावांच्या मंजुरीच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने दिला आंदोलनाचा इशारा.
*🛑बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रस्तावांच्या मंजुरीच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने दिला आंदोलनाचा इशारा.*
*🛑4 ऑगस्ट रोजी ओरोस सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात करणार ठिय्या आंदोलन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २४:-* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत कामगारांचे नोंदणी, नुतनीकरण, योजना लाभ व इतर प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाहीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा होत असल्याने जिल्ह्यातील कामगार संघटनांनी एकत्र येत दि.04 ऑगस्ट रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत जिल्ह्यातील हजारो कामगारांचे नोंदणी, नुतनीकरण व योजनांचे लाभ प्रस्ताव ओरोस कार्यालयाकडे महिनों महिने प्रलंबित राहिले असून जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब कष्टकरी कामगार मंडळाच्या योजनांपासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्याच्या शेजारील रत्नागिरी, कोल्हापूर सह लगतच्या अन्य जिल्ह्यांमध्ये 45 ते 60 दिवसात प्रकरणे निकाली काढली जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप कृती समितीने केला असून कामगारांना मनस्ताप देण्याचे काम कार्यालयाकडून होतं असल्याचे पत्रात नमूद केले आहे. कामगारांच्या पाल्यांचे शिष्यवृत्ती वा इतर लाभाचे प्रस्ताव जवळपास वर्षभर कालावधीपासून प्रलंबित ठेवणे,नवीन नोंदणीचे ऑनलाईन सादर केलेले प्रस्ताव प्रलंबित ठेवून ठराविक तालुक्याचे मंजूर करणेत येतात,कामगारांचे नूतनीकरण प्रस्ताव दीड ते दोन महिने प्रलंबित ठेवले जात असल्याने कामगारांना लाभप्रस्ताव सादर करण्यासाठी अडचणी येतात, बाह्यस्त संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या कीट वितरण प्रक्रियेतील नियोजनशून्य कारभारामुळे कामगार वर्गाला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून मार्च-एप्रिल महिन्यात नोंदणी केलेल्या कामगारांचे संच अद्याप कामगारांना देण्यात आलेले नाहीत,ऑनलाईन पोर्टल वरील दुरुस्तीबाबतचे सादर केलेले प्रस्ताव वर्षभराचा कालावधी उलटून देखील प्रलंबित आहेत,आरोग्य तपासणी ते उपचार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीस संबंधित कंपनी कामचुकारपणा करत असून निव्वळ देयके लाटण्यासाठी कामगारांची फसवणूक केली जात असताना कार्यालयाकडून घेतली जाणारी बघ्याची भूमिका आदी विषयांबाबत कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका जिल्ह्यातील समस्त कामगार वर्गाला बसत असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2025 अंतर्गत कामगारांचे प्रस्ताव 60 कते 90 दिवसांत कार्यवाही होणे नियमाधीन असताना सरकारी कामगार अधिकारी कार्यालय मनमानी कारभार हाकत आहे. निद्रिस्त कार्यालयाला जागं करण्यासाठी व प्रलंबित प्रस्तावांच्या मंजुरीसाठी येत्या 04 ऑगस्ट 2026 रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात सनदशीर मार्गाने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे,रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर,श्रमिक कामगार संघटनेचे प्राजक्त चव्हाण,कोंकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे संतोष तेली,बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेचे अनिल कदम, निवारा बांधकाम कामगार संघटनेचे मंगेश चव्हाण उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

