कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑बनावट सही प्रकरणी ठेकेदार मोहन केळुसकर यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन.

*🛑बनावट सही प्रकरणी ठेकेदार मोहन केळुसकर यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन.*

 

*🛑सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाचा दिलासा; आठवड्यातून दोनदा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २१:-* कणकवली येथील शासकीय ठेकेदार मोहन विद्याधर केळुसकर यांना कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग यांच्या कथित बनावट सही प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अर्जदारांच्या वतीने ॲड. श्रीकृष्ण गणबावले, ॲड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. पृथ्वीराज रावराणे यांनी बाजू मांडली.

प्रकरणातील फिर्यादीनुसार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नामदेव सावंत यांनी १६ जून २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत मोहन केळुसकर यांनी कंत्राटदार ओंकार तुळशीराम पाताडे यांच्या संगनमताने कार्यकारी अभियंत्यांच्या सहीचे बनावटकरण करून प्रस्ताव व देयकांवर खोट्या सह्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकारातून ₹६,७६,५५८ इतकी रक्कम स्वतःच्या खात्यावर बेकायदेशीररीत्या वर्ग करून घेतल्याचा आरोप आहे.

तसेच, ओंकार नंदकुमार पाताडे, मंदार आनंद दामोदर, लक्ष्मण शिवराम राऊळ आणि ओंकार तुळशीराम पाताडे यांनी संगनमताने ३० सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कार्यकारी अभियंत्यांच्या नावाचा शिक्का व बनावट सह्यांचा वापर करून प्रस्ताव आणि देयके सादर केली. या माध्यमातून ₹१०,०४,४४१ इतकी रक्कम बेकायदेशीररीत्या मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात आरोपी क्रमांक १ असलेल्या मोहन केळुसकर यांनी प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली.

न्यायमूर्ती मेहरोझ पठाण यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने मोहन केळुसकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांना प्रत्येक शुक्रवार आणि शनिवार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!