कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑’दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण,संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव.

*🛑’दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण,संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴वेंगुर्ला, दि- २०:-* “एखाद्या विद्यार्थ्याला केवळ शैक्षणिक साहित्य देणे म्हणजे मदत नव्हे;तर त्याच्या स्वप्नांना आधार देणे, आत्मविश्वासाला पंख देणे आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय.” या विचाराची प्रचिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम – वर्ष पाचवे’ या भव्य कार्यक्रमात आली.

शनिवार दिनांक – १८/०७/२०२६ रोजी २:३० ते ५:३० यावेळेत साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि शिक्षकांचा समाजाप्रती असलेला जिव्हाळा यांचे सुंदर दर्शन घडविले. हा कार्यक्रम केवळ सत्कारांचा किंवा साहित्य वितरणाचा सोहळा न ठरता, *’समाजाच्या सहभागातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची चळवळ’* म्हणून उपस्थितांच्या मनात घर करून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रसाद जाधव होते, तर उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस मा. श्री. राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले.राज्य शिक्षक नेते श्री.उदय शिंदे,माजी सभापती श्री.जयप्रकाश चमणकर , विद्यमान सभापती श्री. शंकर घारे, पंचायत समिती सदस्या श्रीमती.साक्षी नार्वेकर व श्रीमती.शीतल राऊत, राज्य प्रतिनिधी श्री.दादा जांभवडेकर,श्री. सचिन मदने ,श्री.प्रशांत मडगावकर ,श्री.संतोष परब,श्री. राजू वजराटकर, जिल्हाध्यक्ष श्री .विठ्ठल गवस, जिल्हा सचिव श्री .तुषार आरोसकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती. निकिता ठाकूर, पतपेढी जिल्हाध्यक्ष श्री .सिताराम लांबर व संचालिका श्रीमती . ऋतुजा जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी कोथमिरे तसेच शिक्षण, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक संघटनेतील विविध मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.

या प्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शालेय शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक समिती सदस्यांचे पाल्य, निवृत्त शिक्षक तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुख यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थी आकस्मिक निधी उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात “शिक्षण हा खर्च नसून समाजाच्या विकासासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. प्रत्येक सक्षम व्यक्तीने एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली,तर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही,”असा प्रेरणादायी संदेश दिला.

संपूर्ण कार्यक्रमात शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचे नियोजन, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा उपक्रम समाजमनाला स्पर्श करून गेला.

‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान आणि विद्यार्थ्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही राष्ट्रनिर्मितीची खरी पायाभरणी आहे,’ हा संदेश देत संपन्न झालेला हा कार्यक्रम वेंगुर्ला तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला. प्रस्ताविक तालुक्याचे सचिव श्री.रामा पोळजी, आभार श्री.राजू वजराटकर तर संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्रीमती.ऋतिका राऊळ यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!