आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आरोस येथे विद्युत प्रवाहित लोखंडी पोलला स्पर्श झाल्याने बोकडाचा मृत्यू

🛑 महावितरण अधिकाऱ्यांनी कॉल न उचलल्याने ग्रामस्थ संतप्त

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ प्रतिनिधी : मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* आरोस येथील गिरोबावाडी परिसरात विद्युत प्रवाहित लोखंडी पोलला स्पर्श झाल्याने एका बोकडाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत बोकड मालक सुदैवाने बचावला असून संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दांडेली येथील शेतकरी बबन धावू शेळके यांच्या मालकीची बकऱ्या घेऊन त्यांचे भाऊ जात असताना दोन बकऱ्या विद्युत प्रवाहित लोखंडी पोलजवळ गेल्या. त्यावेळी दोन्ही बकऱ्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. यामध्ये एका बोकडाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा बोकड बचावला.

यावेळी रस्त्याने जात असलेले आरोसचे पोलीस पाटील महेश आरोसकर यांना बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता एक बोकड लोखंडी पोलला चिकटलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित बांदा-इन्सुली येथील महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही अधिकाऱ्यांनी कॉल न घेतल्याचा आरोप करण्यात आला.

यानंतर त्यांनी सावंतवाडी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. तसेच गावातील वायरमन ओंकार पालकर यांना संपर्क करून तातडीने विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. माहिती मिळताच वायरमन ओंकार पालकर आणि ग्रामपंचायत प्रशासक शंकर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्युत प्रवाहित पोलमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि जबाबदार व्यक्तींचेही फोन संबंधित अधिकारी घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत अशा निष्काळजीपणावर कारवाई करण्याची आणि धोकादायक विद्युत पोलची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थ यावेळी आक्रमक होत, पोलावर वाढलेली झाडी झुडपे,नादुरुस्त पोल तसेच विद्युत समस्या तत्काळ सोडवण्यात यावा, एखादी व्यक्तीला या पोलचा संपर्क झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.त्यामुळे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर गावातील समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!