आणखीआपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोती तलावाच्या फुटपाथ वर पडून चराठे येथील गृहस्थ गंभीर जखमी

◼️सावंतवाडीतील घटना; युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी केले रुग्णालयात दाखल..

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. २० मोती तलावाच्या फुटपाथवरून चालत जात असताना, आकडी आल्याने फुटपाथ वरून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रवादी अध्यक्ष राजीव धार पवार यांनी पाहिली व तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा – बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

संतोष बाळकृष्ण मेस्त्री असे त्या युवकाचे नाव असल्याचे समजत आहे. अधिक माहिती अशी की, संतोष बाळकृष्ण मेस्त्री (४७) रा. चाराठा, असे जखमीचे नाव आहे. ते रामेश्वर प्लाजा परिसरातून मोती तलावाच्या फूटपाथवर चालत असताना, त्यांना अचानक आकडी आली. यात ते त्याठिकाणी कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे अति रक्तस्त्राव होऊन ते अत्यवस्थ बनले.

ही घटना श्री . धारपवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या युवकांना घेऊन एका वाहनातून त्यांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सद्यस्थिती त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!