◾ प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत दोडामार्ग शहरात राबवला सँनिटायझर फवारणी उपक्रम..

 

◾ कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा उपक्रम आदर्शवत ठरेल ; चेतन चव्हाण

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१९:- “माझा गाव माझी जबाबदारी “या ऊक्तीप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळात गावातील लोकांच्या सुरक्षितेसाठी प्राणजीवन सहयोग संस्थचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यानी कोव्हीड 19 चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या संस्थेतर्फे सँनिटायझर फवारणी करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार चेतन चव्हाण यांनी काढले. दोडामार्ग तालुक्याची सुरुवात कसई दोडामार्ग नगरपंचायत येथुन करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह मुख्याधिकारी शिवराज गायकवाड,सरपंच संघटना अध्यक्ष पराशर सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष दिपक गवस, उद्योजक विवेक नाईक, युवा उद्योजक शैलेश गोवेकर, राजेश फुलारी, नगरपंचायत कर्मचारी व स्वच्छता दूत यांसह संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर ऊपस्थित होते.

यावेळी मोफत सँनिटायझर फवारणी शुभारंभ मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,कोव्हीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माझ्या जिल्ह्यातील जनतेचे जीवन सुखकर व्हावे याच भावनेतून आपण आपल्या संस्थेतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी उपक्रम हाती घेतला आहे.यापुढेही जिल्ह्यातील जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे तुम्ही केलेले कौतुक आणि माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप मला निश्चितच उभारी आणि प्रेरणा देणारी आहे. मला तुम्ही दिलेली ही सकारात्मक उर्जा आहे. गावातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी, तसेच गावातील महिला बचतगटांनाही आर्थिक सक्षम करण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून गावात शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविणार असुन गावच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आपण कटिबद्ध आहोत,अशी ग्वाही यावेळी प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष , उद्योजक संदीप चौकेकर यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेचे कार्यक्रमप्रमुख प्रसाद मेहता, सहकार्यक्रम प्रमुख प्रशांत गावडे, उपाध्यक्ष स्वप्निल पुजारे, सचिव सचिन धुरी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!