*🛑दोडामार्गात ओरिजिन कंपनीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; सखोल चौकशीची मागणी
*🛑दोडामार्गात ओरिजिन कंपनीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; सखोल चौकशीची मागणी*
*🛑सासोली जमीन गैरव्यवहार व अवैध उत्खनन प्रकरण तापले; ग्रामस्थांचा मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा*
*🛑अवैध माती उत्खनन आणि वृक्षतोडी विरोधात सासोली ग्रामस्थांची पत्रकार परिषद;*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १४:-* दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील ओरिजिन कंपनी परिसरात सुरू असलेल्या कथित जमीन सपाटीकरण, वृक्षतोड आणि अवैध माती उत्खननाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापले असून, याप्रकरणी सासोली ग्रामस्थांनी दोडामार्ग येथे पत्रकार परिषद घेत प्रशासन आणि संबंधित विभागांवर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार लेखी तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेत स्वतंत्र आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली असून बेकायदेशीरपणे जमीन सपाटीकरण, वृक्षतोड आणि माती उत्खनन सुरू आहे. याबाबत महसूल विभाग, वनविभाग तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणचे छायाचित्रांसह अन्य पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. आवश्यक वाटल्यास मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान, सासोली जमीन प्रकरण विधान परिषदेतही गाजल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला होता. सासोलीतील जमिनी कथितपणे कशा प्रकारे अकृषिक (एनए) करण्यात आल्या, त्यासाठी कथित खोटी कागदपत्रे कशी जोडण्यात आली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात माती उत्खनन कसे सुरू आहे, हे मुद्दे जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांचे आभारही व्यक्त केले.
पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, संबंधित कंपनीला देण्यात आलेली एनए सनद चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आली. ग्रामपंचायतीची कथित खोटी कागदपत्रे सादर करून परवानगी मिळविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नायब तहसीलदारांनी एनए प्रस्तावावरील टिप्पणीत सातबाऱ्यावर नावे नसलेल्या व्यक्तींची नावे प्रस्तावात असल्याचे आणि आकारफोड प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सनद देता येणार नसल्याचे स्पष्ट नमूद केले होते. मात्र, त्या टिप्पण्यांकडे तत्कालीन तहसीलदारांनी दुर्लक्ष करून सनद मंजूर केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
सासोली ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

