🛑जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
*🛑जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ११:-* जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसालचे सन्माननीय अध्यक्ष अवधूत मालणकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. आर. व्ही. नडगदल्ली, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय दुष्परिणाम यांचे सविस्तर विवेचन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्वसामान्य नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन व सहाय्य कशा प्रकारे उपलब्ध करून दिले जाते, याविषयी सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली.
कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष मनीष पारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अवधूत मालणकर यांच्या हस्ते आर. व्ही. नडगदल्ली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संजीव राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव राणे यांनी केले, तर सूत्रसंचालन अशोक गिते यांनी करत जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व कार्यक्रमामागील उद्देश प्रभावीपणे स्पष्ट केला.
समारोपप्रसंगी अध्यक्ष अवधूत मालणकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण होत असून पाणी, अन्न, ऊर्जा व इतर जीवनावश्यक स्रोतांचा पुरवठा मर्यादित असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. सुजाण, जबाबदार व पर्यावरणपूरक नागरिक बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

