🛑भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत कोसळला बिबट्या.
*🛑भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत कोसळला बिबट्या.*
*🛑कुडाळ वनविभागाच्या रेस्क्यूने बचावला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ११:-* पोटाची भूक भागविण्यासाठी भक्ष्याचा पाठलाग करताना मध्यरात्रीच्या अंधारात शेतातील विहिरीचा अंदाज न आल्याने प्रौढ बिबट्या थेट विहिरीत कोसळला.बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्याने तो रात्रभर गुरगुरत झुंज देत राहिला. अखेर शुक्रवारी सकाळी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे (कदमवाडी) येथील नाग्या महादू कातकरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच कुडाळ वनविभागाची रॅपिड रेस्क्यू टीम काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. नियोजनबद्ध मोहीम राबवित बिबट्याला सुखरुप बाहेर काढून त्याला जीवदान दिले.
वसतिगृहापासून अवघ्या साडेतीनशे मीटर अंतरावरील आणि वसतिगृहाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. सकाळी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यालां गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला दुसरा वन्यप्राणी असावा, असा समज झाल्याने तो मागे फिरला. इतरांसह विहिरीजवळ गेल्यावर मात्र विहिरीत मोठा बिबट्या असल्याचे दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त बिबट्याने विहिरीतील पंपाचे पीव्हीसी पाईप दातांनी चावून फोडले होते. एका पाईपचा आधार घेत, स्वतःचा तोल सांभाळला होता. या घटनेची खबर बबन कदम यांनी वनखात्याला दिली.
घटनेची माहिती मिळताच, जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल केतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सूर्यकांत सावंत तसेच वनरक्षक समीर खरवत आणि प्रसाद पाटील यांची रॅपिड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत विशेष पिंजरा उतरविण्यात आला. काही वेळाने बिबट्या स्वतः पिंजऱ्यात शिरताच त्याला सुरक्षितपणे वर काढण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी वन विभागाच्या या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले.
*वैद्यकीय तपासणी करणार!*
बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला कुडाळ येथे नेण्यात आले असून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री झाल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सुटका करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल केतन पाटील यांनी दिली. यंदाच्या वर्षात कुडाळ वन विभागाने अशाप्रकारे चार बिबट्यांना यशस्वीपणे जीवदान दिले असून वन्यजीव संरक्षणातील ही आणखी एक उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

