🛑मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे अर्टिगा कारचा अपघात;गोमांससदृश्य मांसाची बेकायदेशीर वाहतूक उघड.
*🛑मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे अर्टिगा कारचा अपघात;गोमांससदृश्य मांसाची बेकायदेशीर वाहतूक उघड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपास मार्गावरील नेमळे फौजदारवाडी येथे आज (ता. १०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गोमांससदृश्य मांसाची वाहतूक करणारी अर्टिगा कार भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती प्रथम दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर रस्त्याच्या पलीकडे उलटली.
या भीषण अपघातात कारमधील अंदाजे ४०० ते ५०० किलो गोमांससदृश्य मांस रस्त्यावर विखुरले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कारसह संपूर्ण मांसाचा साठा जप्त केला असून चालक सद्दाम दलावसाब यलवट्टी (वय ३१, रा. गोवा, मूळ रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक चौकशीत संबंधित अर्टिगा कार कर्नाटकातील अभय नावाच्या व्यक्तीच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. संशयित चालकाने हे मांस निपाणी येथून आणल्याचे सांगितले आहे. मात्र, मांसाची वाहतूक बर्फाशिवाय करण्यात येत असल्याने ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्याकडे नेले जात असल्याचा संशय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच,संशयिताने यापूर्वीही अशाच प्रकारे मांसाची वाहतूक केल्याची कबुली दिल्याचा दावा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करून मांसाचा प्रकार, त्याचा उगम, वाहतुकीची वैधता आणि संबंधित कायदेशीर बाबींचा सावंतवाडी पोलीस सखोल तपास करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

