कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ “उर्वी फाऊंडेशन मुंबई”चा अनोखा उपक्रम ; दोन विद्यालयांना स्मार्ट टिव्ही देऊन साजरा केला उपक्रम..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-१६ :-  शुक्रवार दि. रोजी “उर्वी फाऊंडेशन मुंबई” चा चांगला उपक्रम सावंतवाडीतील सोनुर्ली गावातील ‘माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली’ आणि ‘जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नं १’ या दोन विद्यालयांना स्मार्ट टिव्ही देऊन मुलांना या ऑनलाईन युगात स्मार्ट टिव्ही चा मुलांनी चांगला उपयोग करून अभ्यास करून शिक्षणातून या जगात पुढे यावे

या वेळी उपस्थित उर्विचे सिताराम नारायण पुळसकर (आजोबा), सुजाता सिताराम पुळसकर(आजी), रोहन सिताराम पुळसकर(बाबा),अश्विनी रोहन पुळसकर(आई), शौर्य रोहन पुळसकर(छोटा भाऊ), रतिश पुळसकर (मोठे बाबा ), अनुश्री पुळसकर (मोठी आई ),ध्रुवा, ध्रुव रतिश पुळसकर ( मोठे ताई दादा ),तुकाराम पुळसकर, आनंद गावडे, स्नेहा गावडे, सुहास परब, वामन जगताप, सुनिल राऊळ, सुधिर राऊळ आणि मोर्ये सर, चव्हाण सर इतर मान्यवर उपस्थित होते.

देवाने माणसाचा जन्म दिलाय,त्याचे जन्माला येऊन काहीतरी समाजपयोगी कार्य करून ऋण फेडले पाहिजे, आपल्या हातून जितकं होईल तितके सत्कर्म करत रहायला हवंय,गेली अनेक वर्षे समाजहितासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून जमेल तशी मदत अनेक जवळच्या संस्थांसोबत कार्यरत राहून करत आलोय,आज कै. कुमारी उर्वी रो. पुळसकर हिच्या स्मरणार्थ “उर्वी फाऊंडेशन मुंबई” ची सुरुवात केली .

उर्वि फाऊंडेशनची स्थापना कशी झाली?

उर्वि हे एका मुलीचे नाव आहे तीचे वयवर्ष ३ होते आणि आता हे नाव कालबाह्य झाले तरी तीच्या कुंटूबात तीच्या आठवणी आजुन जीवंत आहेत आता ती मुलगी आठवणीतच आहे…. कारण ह्या मुलीचे गेल्या वर्षी १२मार्च २०२० ला आजीआजोबांन सोबत ऍक्टिवा या गाडीने होळीसाठी सोनुर्ली माऊली च्या देवळात जाताना मंदिरा जवळ च्या रस्त्यालाच एसटी महामंडळच्या गाडी खाली येऊन दुर्देवी मृत्यु झाला. त्या दिवसा पासुन ते आता पर्यंत ते कुंटूब दु:खात आहे.त्यानंतर ह्या कुंटूबानी उर्वी च्या नावाने उर्वि फाऊंडेशनची स्थापना केली.

जो पैसा उर्वी या आपल्या लाडक्या मुलीच्या नावाने जमा करणार होते तोच पैसा या फाऊंडेशनच्या माध्यमातुन गरीब आणि होतकरू मुलांच्या चांगल्यासाठी तसेच रक्तदान गडकिल्ले संवर्धन या माध्यमातुन ते लोकांना मदत करत असतात त्यांना या उपक्रमात उर्वी फाउंडेशन मधील सर्व सभासद तसेच सुधिर राऊळ , सुनिल राऊळ हे त्याच्या या चांगल्या उपक्रमास हातभार लावत असतात.चांगली कार्य करण्याचा आणि समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहू,तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम पाठीशी राहूदे असे पुळसकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!