कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑”लोकांच्या जीवाशी खेळ थांबवा! गढूळ पाण्यावरून उमाकांत वारंग संतप्त; नगरपरिषदेला मोर्चाचा इशारा”

*🛑”लोकांच्या जीवाशी खेळ थांबवा! गढूळ पाण्यावरून उमाकांत वारंग संतप्त; नगरपरिषदेला मोर्चाचा इशारा”*

 

*🛑मुख्याधिकारी अनुपस्थित; गढूळ पाणी घेऊनच नगरपरिषदेत धडक…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-*”नागरिक आजारी पडल्यास जबाबदार कोण?” असा थेट सवाल सावंतवाडी शहरात नागरिकांच्या नळांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी सोमवारी नगरपरिषद कार्यालयात धडक देत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. हातात गढूळ पाण्याचा नमुना घेऊन मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या वारंग यांना मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

“लोकांच्या जीवाशी का खेळता? हे दूषित पाणी पिऊन लहान मुले किंवा नागरिक आजारी पडले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल करत वारंग यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी अधिकारी अंधारे यांनी पाईपलाईनला गळती झाल्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे सांगत, दुरुस्तीचे काम आजच पूर्ण करून समस्या दूर केली जाईल, असे आश्वासन दिले.

मात्र, या उत्तरावर समाधान न मानता वारंग यांनी, “तात्काळ उपाययोजना न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर मोर्चा काढू,” असा स्पष्ट इशारा दिला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाची निष्काळजी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक अशोक पवार यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या कामामुळे झालेल्या पाईपलाईन नुकसानीची भरपाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई व दुरुस्ती केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, अशोक पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे ही नगरपरिषदेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठ्याच्या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!