🛑राजकारण विसरून कॅरम बोर्डवर रंगला महायुतीचा डाव; श्रद्धाराजे भोंसले विरुद्ध संजू परब-अनिल निरवडेकर लढत ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू!
*🛑राजकारण विसरून कॅरम बोर्डवर रंगला महायुतीचा डाव; श्रद्धाराजे भोंसले विरुद्ध संजू परब-अनिल निरवडेकर लढत ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू!*
*🛑’जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’मध्ये लोकप्रतिनिधींच्या मैत्रीपूर्ण सामन्याने जिंकली प्रेक्षकांची मने; शेवटच्या सोंगटीवर अनिल निरवडेकर-संजू परब यांची बाजी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ मध्ये क्रीडा स्पर्धांइतकाच चर्चेचा विषय ठरला तो लोकप्रतिनिधींमध्ये रंगलेला कॅरमचा थरारक सामना.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि नगरसेवक अजय गोंदावळे यांच्या जोडीसमोर उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर व माजी नगराध्यक्ष संजू परब यांची जोडी उभी ठाकली. राजकीय सभागृहात अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकणारे हे दिग्गज यावेळी कॅरम बोर्डवर खेळाडूच्या भूमिकेत दिसताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सामन्याची सुरुवात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी केली. सुरुवातीपासूनच संजू परब यांनी अचूक स्ट्रोक्स खेळत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला, तर अॅड. अनिल निरवडेकर यांनी क्वीन आणि कव्हर घेत डाव आपल्या बाजूने झुकवला. दुसरीकडे श्रद्धाराजे भोंसले यांनी हार न मानता अखेरच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली. अजय गोंदावळे यांनीही त्यांना समर्थ साथ दिली.
सामना अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना बोर्डवर अवघ्या काही सोंगट्या शिल्लक होत्या. अशा निर्णायक क्षणी अॅड. अनिल निरवडेकर यांनी शेवटची सोंगटी अचूकपणे पॉकेट करत विजयावर शिक्कामोर्तब केले. विजय मिळताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्या जोडीचे अभिनंदन केले.
यावेळी संजू परब यांनी मिश्कील शैलीत, “संजू परब आणि अॅड. अनिल निरवडेकर एकत्र असले की डाव जिंकला जातो!” अशी टिप्पणी करत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन खेळातून मैत्री, संवाद आणि सौहार्द जपणारे हे चित्र उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरले. या वेळी क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, अॅड. सिद्धार्थ भांबुरे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

