वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. १५ वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत वैभववाडी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन केले. ग्राहकांकडून पैसे उकळणारी या कार्यालयात अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. पैसे घेऊनच कामे केली जात आहेत असा आरोप करत या टोळीतील अधिकारी निलंबित झाल्याशिवाय कार्यालय समोरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा नासीर काझी, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे यांनी घेतला. पंतप्रधान मोदींवर एकेरी भाषेत बोलणाऱ्या त्या कनिष्ठ अभियंत्याला पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः खडसावून काढले. मोदीं वर बोलण्याची तुझी लायकी आहे का? तू कोणाकडून सुपारी घेतली आहेस का? अशा प्रश्नांचा भडीमार पदाधिकारी यांनी केला. अनेक ग्राहकांना उर्मट भाषेत बोललेल्या व्हिडिओ क्लिप तसेच मोदींवर बोललेली क्लिप ठिय्या आंदोलनात वाजवून दाखविण्यात आली. त्या अधिकाऱ्याने क्लिप मधील आवाज आपलाच असल्याचे मान्य करत मी परत असे बोलणार नाही असे म्हणत आंदोलनासमोर दंडवत घालत माफी मागितली.
त्याचबरोबर कोरोनात एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती मयत झालेल्या असताना त्या घरातील महिलेकडून जीर्ण वीज खांब बदलण्यासाठी तब्बल आठ हजार रुपये घेतलेल्या त्या कनिष्ठ अभियंत्याला आंदोलकांनी खडसावून काढले. त्या अधिकाऱ्यांने मी पैसे घेतले असे मान्य केले. आठ हजार घेतलात दंडासहित सोळा हजार परत द्या. अशी मागणी श्री. रावराणे, स्वप्नील खानविलकर यांनी लावून धरली. दरम्यान सर्वच कार्यकर्ते आक्रमक झाले. अखेर त्या अधिकाऱ्याने 16 हजार रुपये आंदोलनस्थळी परत करताच भाजपा पदाधिकारी शांत झाले.
कनिष्ठ अभियंता श्री. थोरबोले, श्री. मुल्ला या अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवा. आणि निलंबनासाठी प्रस्ताव पाठवा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. एवढ्यावरती पदाधिकारी न थांबता तुम्ही वैभववाडी कधी सोडून जाणार ते सांगा. असा सवाल उप कार्यकारी अभियंता श्री. सूर्यवंशी यांना केला.
कृषी पंप कनेक्शन देण्यासाठी 11 वर्ष का लागतात. पैसे दिल्यावर कसे लगेच मिळतात. पोल बदलण्याची कामे का करत नाहीत. अशा अनेक प्रश्नांचा पदाधिकाऱ्यांनी भडीमार केला. किती अधिकाऱ्यांनी ग्राहकांकडून पैसे घेऊन उकळून वैभववाडीत जमिनी घेतल्या आहेत. ती नावे जाहीर करू का? असा गंभीर आरोप प्रमोद रावराणे यांनी केला. मेलेल्या व्यक्तींच्या टाळूवरील लोणी खाऊन तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. असा शाप यावेळी नासिर काझी, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे यांनी दिला.
विज बिल भरण्यासाठी मुदत द्या. घरात घुसून नाहक त्रास द्याल तर याद राखा. 17 मेळावे तालुक्यात घेतलात तर किती प्रश्न सोडवले. कोरोनात वाढीव बिले ग्राहकांच्या माथी मारलात. उलट शंकेचे निरसन करण्यास आलेल्या ग्राहकांना अपशब्द बोलून अपमानीत का करता? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. ग्राहकांना उर्मट भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना भर बाजारात प्रसाद देणार असा सज्जड दम जयेंद्र रावराणे यांनी दिला. आंदोलनकर्त्यांनी केलेले आरोप, दाखविलेल्या व्हिडीओ क्लिप, घेतलेले पैसे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने उपस्थित पोलिस अधिकारीही अवाक झाले. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पीएसआय प्रवीण देसाई व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनात भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, सज्जन काका रावराणे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, सरपंच एस. एम. बोबडे, बाळा हरयाण, संतोष माईणकर, शुभांगी पवार, प्राची तावडे, प्रदीप नारकर, राजू पवार, महेश रावराणे, उदय पांचाळ, स्वप्नील खानविलकर, पुंडलिक पाटील, बंधू वळंजू व कार्यकर्ते उपस्थित होते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

