◾ खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडीत विविध सामाजिक उपक्रम; रूपेश राऊळ
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१४-: खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे.
याबाबत त्यानी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असं म्हटलं आहे की तालुक्यात पोलीस पाटील यांनी कोरोना काळात भारी उत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच कोरोना युद्ध म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे तसेच महिला संघटना युवा सेना बेसिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते जि. प सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच व पदाधिकारी व भूत शाखाप्रमुख उपतालुकाप्रमुख उपविभागप्रमुख विभाग प्रमुख तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत तालुक्यात हा वाढदिवस साजरा होणार आहे तसेच प्रत्येक विभागामध्ये विविध उपक्रम घेतले जाणार असल्याचे ही राऊळ यांनी सांगितले आहे.

