🛑 भर दिवसा गुंडगिरी, मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद; दोडामार्गच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह?
🛑 २७ वर्षांचा दोडामार्ग… ना सत्ताधाऱ्याचा वचक, ना स्ट्रॉंग विरोधक; दोडामार्ग नेमका कोणत्या दिशेने?
🛑 सलग दोन रविवारी तीन गंभीर घटना; पर्यटनाचे स्वागत, पण गुंडगिरीला आळा कधी? पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या भूमिकेकडे लक्ष..
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ विशेष लेख : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३०:- दोडामार्ग हा निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने ओळख निर्माण करत आहे. मांगेलीसह तालुक्यातील धबधबे सुरू होताच शेकडो पर्यटक येथे दाखल होतात. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली काही मद्यधुंद आणि बेशिस्त पर्यटकांकडून होणाऱ्या दादागिरीमुळे दोडामार्गच्या शांततेला आणि सुरक्षिततेला तडा जात असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे.
अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत, सलग दोन रविवारी घडलेल्या तीन गंभीर घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही घटनांमध्ये गोव्यातून आलेल्या मद्यधुंद पर्यटकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ही केवळ योगायोगाने घडलेली प्रकरणे नसून वाढत्या बेशिस्तीचा स्पष्ट इशारा मानावा लागेल.
पहिली घटना २१ जून रोजी दोडामार्गच्या आठवडा बाजारात घडली. हजारो नागरिक खरेदीसाठी उपस्थित असताना गोव्यातील एका मद्यधुंद चालकाने भर दिवसा बेफाम वाहन चालवत चार ते पाच वाहनांना धडक दिली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर जाब विचारणाऱ्या नागरिकालाच भर बाजारात बेदम मारहाण केली. नागरिकांची मोठी गर्दी असतानाही कायद्याची भीती न बाळगता घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
दुसरी घटना २८ जून रोजी दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी येथे घडली. दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे बंधू तथा जिम चालक रोहन चव्हाण यांनी त्यांच्या घरासमोरील निवासी परिसरात दारू पिण्यास आणि गैरप्रकार करण्यास विरोध केला. याचा राग मनात धरून एका अनोळखी तरुणाने रोहन चव्हाण आणि त्यांचे सहकारी शुभम मुळगांवकर यांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे हा प्रकारही भर दिवसा घडला. जर लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनाही अशा प्रकारच्या धमक्यांना सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
त्याच दिवशी तिसरी घटना साटेली-भेडशी बाजारपेठेत घडली. पार्किंगच्या कारणावरून गोव्यातील मद्यधुंद पर्यटकांनी तालुक्यातील एका प्रतिष्ठित स्थानिक व्यक्तीशी हुज्जत घालत दादागिरी केल्याची घटना समोर आली. ही घटना देखील भर दिवसा घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
या तिन्ही घटनांमध्ये एक समान धागा स्पष्ट दिसून येतो—मद्यधुंद अवस्था, कायद्याची भीती नसलेली मानसिकता आणि दिवसाढवळ्या सर्वांसमोर होणारी दादागिरी. सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे, चाकूचा धाक दाखवणे, वाहनांची तोडफोड करणे किंवा बाजारपेठेत दहशत निर्माण करणे, हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता येणार नाही.
पर्यटनाला कोणाचाही विरोध नाही. उलट दोडामार्गमध्ये अधिकाधिक पर्यटक यावेत, हीच स्थानिकांची इच्छा आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली दारू, गांजा किंवा अन्य अमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. काही बेशिस्त पर्यटकांमुळे संपूर्ण पर्यटन संस्कृती बदनाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मांगेली धबधबा परिसरात यापूर्वीही मद्यधुंद पर्यटकांकडून गोंधळ, अश्लील वर्तन आणि वाद झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा वातावरणात एखादे कुटुंब, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक पर्यटनासाठी सुरक्षितपणे कसे येणार? हा प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही.
त्यामुळे आता पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. गोवा-दोडामार्ग सीमारेषेवर कायमस्वरूपी तपासणी नाके उभारणे, मद्यधुंद चालकांवर तात्काळ कारवाई करणे, खोक्रल मंदिर परिसरासह मांगेलीकडे जाणाऱ्या मार्गांवर नियमित वाहन तपासणी करणे, तसेच पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवणे ही काळाची गरज आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सातत्याने कठोर भूमिका घेत आहेत. दारू, ड्रग्ज, गांजा आणि अवैध धंद्यांविरोधात त्यांनी वेळोवेळी कठोर कारवाईची भूमिका मांडली आहे. त्यामुळे दोडामार्गमध्ये मद्यधुंद व अमली पदार्थांच्या प्रभावाखाली येऊन दादागिरी करणाऱ्यांविरोधातही त्यांनी लक्ष घालून पोलीस प्रशासनाला कठोर आणि प्रभावी कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
यासोबतच मतदारसंघाचे स्थानिक आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही या वाढत्या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत पर्यटनस्थळांवरील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, दोडामार्ग तालुक्याचा नुकताच २७ वा वर्धापन दिन पार पडला. मात्र या २७ वर्षांच्या प्रवासानंतरही नागरिकांच्या मनात एकच प्रश्न कायम आहे—ना सत्ताधाऱ्यांचा पुरेसा वचक, ना प्रभावी विरोधकांचा दबाव; मग दोडामार्ग नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे? विकास, सुरक्षितता आणि मूलभूत प्रश्नांवर आजही नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दोडामार्गला पर्यटन हवे आहे; पण गुंडगिरी करणारे पर्यटक नकोत. भर दिवसा नागरिकांना मारहाण, चाकूचा धाक आणि दादागिरी होत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर दोडामार्गच्या सुरक्षित भविष्यासमोरील गंभीर इशारा आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी या विषयात लक्ष घालून प्रशासनाला कठोर आणि प्रभावी कारवाईसाठी निर्देश द्यावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
२७ वर्षांचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आता दोडामार्गला केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस निर्णयांची आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. अन्यथा “२७ वर्षे… फक्त प्रतीक्षा!” हीच भावना अधिक तीव्र होत जाईल.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

