कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव येथे शौर्य,त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर.

*🛑मळगाव येथे शौर्य,त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर.*

 

*🛑शिवशंभू ग्रुपतर्फे शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* मळगाव येथे शनिवारी शिवशंभू ग्रुपच्यावतीने तिथीनुसार छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव (२६ जून) आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराजाभिषेक सोहळा (२७ जून) या दोन्ही ऐतिहासिक दिवसांचे औचित्य साधून जन्मोत्सव व शिवराजभिषेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवराजाभिषेक प्रतिमा तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन्ही महाराजांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शिवराजाभिषेक प्रतिमेस व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी निवृत्त राज्यपत्रित अधिकारी ह. भ. प. श्री शेखर पाडगावकर, मळगाव इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, माजी सैनिक तथा सर्पमित्र आनंद राणे, समीर परब आदी मान्यवरांसह शिवशंभू ग्रुपचे अध्यक्ष सहदेव राऊळ, खजिनदार सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सुधीर राऊळ, उपाध्यक्ष प्रथमेश राणे, अश्विन गाड, अमित राऊळ, अमित नाईक, रंजना तेली, नितेश तेली, पत्रकार नितीन गावडे, महेश पंतवालावलकर, भगवान रेडकर, दाजी राऊळ, हर्षिता राऊळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल रेबीज प्रतिबंधक कार्यात योगदान देणाऱ्या अमित नाईक, अमित राऊळ आणि पोलीस दलात भरती झालेल्या कु. क्षितिजा राऊळ यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिव–शंभूंच्या पराक्रम, त्याग, स्वराज्यनिष्ठा व राष्ट्रभक्तीच्या विचारांवर मार्गदर्शन करून तरुण पिढीने या मूल्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शिवशंभू ग्रुप राबवित असलेल्या बलिदान मास, दुर्गामाता दौड, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आदी उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर परब यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!