कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 ‘श्री देव वेतोबा चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेत ‘जपान सेवन पावशी’ संघ ठरला महाविजेता!

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग 

🎴पाट-म्हापण, दि-२४:– श्री देव वेतोबा क्रिकेट संघ मायणेवाडी व निकीत राऊळ मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अँडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा २०२६’ म्हणजेच ‘श्री देव वेतोबा चषक – पर्व ८ वे’ अतिशय उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडले. २१, २२ आणि २३ जून २०२६ रोजी पाट हायस्कूल जवळ, शरयु मंगल कार्यालय (पाट म्हापण) येथे या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रंगतदार स्पर्धेत ‘जपान सेवन पावशी’ संघाने उत्कृष्ट कामगिरी करत महाविजेतेपदाचा बहुमान पटकावला.

अनेक आव्हानांना सामोरे जात स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून परुळे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते व वेतोबा पेट्रोलियम परुळेचे सर्वेसर्वा श्री. घनश्याम उर्फ निलेशजी सामंत, म्हापण गावचे माझी सरपंच श्री. गुरुनाथ मडवळ आणि कोचरा गावच्या विद्यमान पोलीस पाटील सौ. शर्मिला नितीन दळवी उपस्थित होत्या.

विजेते संघ आणि बक्षिसांचा पाऊस

स्पर्धेतील अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीनंतर खालील संघांनी अनुक्रमे यश संपादन केले:

प्रथम क्रमांक (महाविजेता): जपान सेवन पावशी (रु. ५०,०००/- व आकर्षक चषक)

द्वितीय क्रमांक (उपविजेता): गवळदेव पावशी (रु. २५,०००/- व चषक)

तृतीय क्रमांक: रुद्रांश स्पोर्ट्स मालवण (रु. ५,०००/- व चषक)

चतुर्थ क्रमांक: आर्यन स्पोर्ट्स पिंगुळी (रु. ५,०००/- व चषक)

या मुख्य क्रमांकांसोबतच उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ, दोस्ती कट्टा हुमरमळा, रेकोबा वायरी आणि वेदु सुधिर ७ मालवण या संघांनाही प्रत्येकी १,५००/- रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक पारितोषिके

खेळाडूंच्या मैदानावरील सर्वोत्तम कामगिरीसाठी खालीलप्रमाणे वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले:

मालिकावीर : आशु भोगटे (गवळदेव पावशी)

उत्कृष्ट फलंदाज: हर्षद खोत (गवळदेव पावशी)

उत्कृष्ट गोलंदाज: शैलु सावंत (जपान सेवन)

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: अमर नाईक (जपान ७ पावशी)

उत्कृष्ट यष्टीरक्षक : तेजस लुटबे (रेकोबा वायरी)

तसेच याप्रसंगी मायानेवाडीतील अनेक नामांकित मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. उपस्थित मान्यवरांमध्ये प्रामुख्याने:

१) श्री. ज्ञानेश्वर कोचरेकर २) श्री. दत्ताराम कोनकर ३) श्री. अनंत (बाळा) राऊळ ४) श्री. सुशील राऊळ ५) श्री. रवींद्र राऊळ ६) श्री. रमेश राऊळ ७) श्री. गोविंद राऊळ ८) श्री. कमलेश परब ९) श्री. ब्रिजेश तायशेटये १०) श्री. निलेश घाडी ११) श्री. प्रसाद दाभोलकर १२) श्री. शैलेश गोसावी १३) श्री. बाबजी हंजनकर १४) श्री. निखिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नियोजन आणि आभार

या संपूर्ण स्पर्धेदरम्यान बादल चौधरी, समीर चव्हाण, निखिल पाटकर आणि तेजस तोरसकर यांनी आपल्या बहारदार समालोचनाने सामन्यांमध्ये रंगत आणली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सुहास दत्ताराम कोनकर, श्री निकीत अशोक राऊळ, श्री निलेश सामंत आणि आळवे बंधु म्हापण यांचे विशेष सहकार्य लाभले.

आयोजकांनी स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ, खेळाडू, देणगीदार, पंच आणि क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, पुढील वर्षी ‘श्री देव वेतोबा चषक २०२७ – पर्व ९ वे’ काहीतरी नवीन संकल्पना घेऊन अधिक भव्य स्वरूपात खेळवले जाईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!