कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिरशिंगेच्या श्रेयस शिर्केची भारतीय नौदलात भरारी; गावाकडून सत्कार करून गौरव‌.

*🛑शिरशिंगेच्या श्रेयस शिर्केची भारतीय नौदलात भरारी; गावाकडून सत्कार करून गौरव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या शिरशिंगे येथील गोटवेवाडीचा सुपुत्र कुमार श्रेयस सुरेश शिर्के याने भारतीय नौदलात भरती होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या शिर्के कुटुंबातील तो तिसऱ्या पिढीतील जवान ठरला असून त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

श्रेयस हा शिरशिंगे गावचे माजी सरपंच सुरेश शिर्के यांचा मुलगा असून त्याने इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शाळा, शिरशिंगे गोटवेवाडी येथे घेतले. त्यानंतर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. देशसेवेची जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्याने भारतीय नौदलाच्या एसएसआर (SSR) प्रवेश प्रक्रियेत यश मिळवत भारतीय नौदलात प्रवेश मिळविला.

नौदलात दाखल झाल्यानंतर त्याचे प्राथमिक प्रशिक्षण ओडिशा येथील आय.एन.एस. चिल्का येथे पूर्ण झाले. प्रशिक्षणादरम्यान त्याला अभियांत्रिकी विभागातील मेकॅनिकल इंजिनियर ही शाखा प्राप्त झाली. सध्या तो लोणावळा येथील आय.एन.एस. शिवाजी येथे व्यावसायिक प्रशिक्षण घेत असून त्यामध्ये अभियांत्रिकी शाखेचे सखोल ज्ञान, तांत्रिक कौशल्य तसेच नौदलातील यंत्रसामुग्रीची देखभाल व संचलन यासंबंधीचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे श्रेयसच्या कुटुंबात देशसेवेची गौरवशाली परंपरा आहे. त्याचे आजोबा सैन्यात कार्यरत होते, तर काकांनीही सैन्यदलात सेवा बजावली आहे. त्यामुळे श्रेयस हा त्यांच्या घरातील तिसऱ्या पिढीतील युवक असून भारतीय नौदलात भरती होत देशसेवेचा वारसा पुढे चालवत आहे.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक सदस्य रविंद्रजी मडगावकर, सरपंच दीपक राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ, माजी सरपंच नारायण राऊत, पांडुरंग राऊळ, गणपत राणे, गणपत राऊळ, वासुदेव राऊळ, प्रशांत देसाई, रवी परब, बाळकृष्ण पेडणेकर, सुनील तावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्रेयसचे अभिनंदन करून त्याच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

शिरशिंगे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील अनेक युवकांनी भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात सेवा बजावून देशसेवेत मोलाचे योगदान दिले आहे. श्रेयस शिर्केच्या यशामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!