आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्गात २२ जूनला भव्य सकल हिंदू संमेलन

🛑 हिंदू ऐक्य, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जागृतीचा संदेश; अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज व अर्जुन चांदेकर यांचे मार्गदर्शन

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग, दि-२०:- सनातन हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीचे जतन आणि हिंदू समाजातील ऐक्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने दोडामार्ग येथे सोमवार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. विविध स्तरांतील हिंदू समाजाला एकत्र आणून धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीय मूल्यांविषयी जनजागृती घडवून आणण्याचा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास अनुभवला असून अनेक संकटांनंतरही तिची मूल्यव्यवस्था आणि परंपरा आजही टिकून असल्याचे आयोजकांनी नमूद केले. हिंदू समाजाच्या श्रद्धा, अस्मिता आणि संघर्षाचे प्रतीक ठरलेले अयोध्येतील राम मंदिर हे या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे महत्त्वपूर्ण उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने जाती, पंथ आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक असल्याचा संदेश या संमेलनातून दिला जाणार आहे. हिंदू समाजातील ऐक्य, जागरूकता आणि संघटनबळ वृद्धिंगत करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी येथील प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे प्रांत संघचालक अर्जुन (बाबा) यशवंत चांदेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

सकल हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक नितीन नारायण गवस यांनी संमेलनाची माहिती देताना सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेला श्री रामदास केशव मणेरीकर, नवनाथ सुरेश सावंत, श्रवणकुमार राजपुरोहित, राजाराम सावंत, चैत्राली भोळे, आकांक्षा शेटकर, महेश शेटकर, उदय पास्ते, निलेश साळगावकर, एकनाथ गवस आदी उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!