🛑”आजगावात मायनिंग होणार नाही; पण ड्रोन सर्वेक्षणाला स्थगिती कधी?” – रूपेश राऊळांचा पालकमंत्री नितेश राणेंना सवाल
*🛑”आजगावात मायनिंग होणार नाही; पण ड्रोन सर्वेक्षणाला स्थगिती कधी?” – रूपेश राऊळांचा पालकमंत्री नितेश राणेंना सवाल*
*🛑सातार्डा खाण प्रकरण आणि आडाळी एमआयडीसीतील कथित बेकायदा उत्खननाची चौकशी करण्याची मागणी;आमदार दीपक केसरकरांवरही टीकेची झोड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आजगाव येथील मंदिरात जाऊन “मी पालकमंत्री असेपर्यंत आजगावसह ११ गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होणार नाही,” अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर आता प्रशासनाने मंजूर केलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची जबाबदारीही पालकमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. “आजगावसह ११ गावांतील ग्रामस्थांच्या भावना समजून घेण्यासाठी पालकमंत्र्यांना मंदिरात यावे लागले, मात्र चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले दीपक केसरकर या प्रश्नावर ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
राऊळ यांनी सातार्डा येथील डेक्कन मिनरल्स प्रा. लि. कंपनीच्या खाणकामाचा संदर्भ देत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अधिकृतपणे केवळ ४०.३७ हेक्टर क्षेत्रात उत्खननाची परवानगी असताना शेजारच्या ५२.२२ आणि २०.२६ हेक्टर क्षेत्रातही कथितपणे बेकायदेशीर उत्खनन झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. विशेषतः २०.२६ हेक्टर क्षेत्रातील खाण कोसळल्यानंतरही प्रशासनाने कोणती कारवाई केली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय आडाळी एमआयडीसी परिसरातील सरकारी जमिनीवर मायनिंगसदृश माती उत्खनन झाल्याचा आरोप करत, “सरकारी जमिनीवरील ही लूट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कशी खपवून घेत आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी आता पालकमंत्र्यांवर असल्याचे राऊळ म्हणाले.
आजगावातील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच ड्रोन सर्वेक्षण, सातार्डा खाण प्रकरण आणि आडाळी एमआयडीसीतील कथित बेकायदेशीर उत्खननाबाबतही पालकमंत्री ठोस भूमिका घेणार का, याकडे आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

