🛑उद्घाटनाला अभिनेत्री प्राजक्ता माळी, अवघ्या ४८ तासांत FDAचा दणका;’आपला बझार’ला व्यवसाय बंदची नोटीस.
*🛑उद्घाटनाला अभिनेत्री प्राजक्ता माळी, अवघ्या ४८ तासांत FDAचा दणका;’आपला बझार’ला व्यवसाय बंदची नोटीस.*
*🛑वैध अन्न परवाना नसल्याचे तपासणीत उघड; विनापरवाना अन्न व्यवसाय गंभीर गुन्हा, गुळाचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २०:-* कुडाळ येथे अवघ्या चार दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आलेल्या ‘आपला बझार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकांकडे वैध अन्न परवाना नसल्याचे आढळून आल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या ४८ तासांतच या स्टोअरला FDAच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने कुडाळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, या स्टोअरचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले होते. मात्र त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी सायंकाळी अचानक तपासणी मोहीम राबवून अनेक त्रुटी उघड केल्या.
कुडाळ-वेंगुर्ले विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी शनिवारी एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आणि सहकारी अधिकारी गावित यांनी ‘आपला बझार’ची प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीवेळी स्टोअरचे मालक श्री. नाईक उपस्थित नव्हते. तसेच व्यवसायासंबंधी आवश्यक माहितीही दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आलेली नव्हती.
यावेळी स्टोअर मॅनेजर अमोल सुतार यांच्या उपस्थितीत पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम ३१ नुसार त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
चंदनशिवे यांनी सांगितले की, ज्या अन्न व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त असते, त्या व्यावसायिकांना FDAचा वैध परवाना घेणे बंधनकारक असते. संबंधित स्टोअर व्यवस्थापनाने स्वतःच वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. असे असतानाही आवश्यक परवाना घेतलेला नव्हता.
विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे हा अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असून कलम ६३ नुसार तो शिक्षेस पात्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वैध परवाना प्राप्त होईपर्यंत स्टोअर सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्टोअरमधील गुळाच्या साठ्याबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याची माहितीही चंदनशिवे यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

