◾ वीज कनेक्शन तोडण्यासाठी सिंधुदुर्गात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट..
◾ जिल्ह्याची अवस्था ‘एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे वाढीव वीजबिले दारी’
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-११:- कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून गरीब आणि सामान्य वर्गातील लोकांचे अक्षरशा हालाखीचे दिवस सुरू झाले आहेत, अनेक जणांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या, लोकांचे धंदे बंद झाले आणि हातावर पोट असलेल्यांचे तर जगणं मुश्किल झाले आहे आणि अशातच महावितरण कंपनीने वाढीव वीजबिले देऊन सामान्य-तसेच गरीब जनेतेचे कंबरडे मोडण्याचा घाट घातला आहे.’एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे वाढीव वीजबिले दारी’ यामुळे गरीब तसेच सामान्य जनता मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसत आहे.वाढीव विजबिलाविरोधात अनेक राजकीय पक्षांनी पुढे येत आंदोलनं सुद्धा केली, सिंधुदुर्ग पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत घेऊन एकही विद्युत पुरवठा खंडित करु नका असा आदेशही दिला, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा वीज कनेक्शन तोडण्यासाठी सुळसुळाट दिसुन आला.महावितरणच्या कार्यालयात याचा जाब विचारला असता आम्हाला वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून थकीत वीज कनेक्शन आजपासून तोडण्यात यावे असा आदेश आला आहे आज महाशिवरात्री असल्याने उद्यापासून वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात करु अशी उत्तरे देण्यात आली

