कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑झाराप रेल्वे स्थानकावरून गोव्याकडे जाणारी खनिजमाती नेमकी कुठली?

*🛑झाराप रेल्वे स्थानकावरून गोव्याकडे जाणारी खनिजमाती नेमकी कुठली?*

 

*🛑तळवणे-कोंडुरा परिसरात बेकायदा उत्खनन सुरू असल्याचा संशय;डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* झाराप रेल्वे स्थानकावरून वास्को (गोवा) येथे मोठ्या प्रमाणावर पाठवली जात असलेली खनिजसदृश्य माती नेमकी कोणती आहे, याबाबत सध्या जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात पर्यावरण अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

डॉ. परुळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये आठ ते दहा रेल्वेगाड्या खनिजसदृश्य मातीने भरून झाराप रेल्वे स्थानकावरून गोव्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दररोज सुमारे पाचशे डंपरद्वारे ही माती स्थानकावर आणून साठवली जात असल्याचे दिसून येत आहे.

या मातीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते ही माती आडाळी परिसरातील कथित अवैध मायनिंगमधून आणली जात आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही खनिजमाती तळवणे-कोंडुरा परिसरातून आणली जात असल्याची चर्चा आहे.

यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे. तळवणे परिसरात अधिकृत मायनिंग सुरू आहे का? जर असेल तर पर्यावरण आघात मूल्यांकन (EIA), जनसुनावणी आणि अन्य आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असताना संबंधित यंत्रणांचे लक्ष त्याकडे का गेले नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

डॉ. परुळेकर यांच्या म्हणण्यानुसार, गुगल अर्थच्या माध्यमातून तळवणे-कोंडुरा परिसराचे निरीक्षण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही आवश्यक परवानग्या, नियम व अटींचे पालन न करता हे उत्खनन सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच या प्रकाराकडे जिल्हा खनिकर्म विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शासनाच्या महसुलाला मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून पर्यावरणाची अपरिमित हानी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून उत्खननाची वैधता, खनिजमातीचा प्रकार, वाहतुकीची परवानगी आणि महसूल विभागाच्या नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

डॉ. परुळेकर यांचे प्रमुख प्रश्न.

झाराप रेल्वे स्थानकावरून पाठवली जाणारी माती नेमकी कोणती?

*तळवणे-कोंडुरा येथे अधिकृत मायनिंग सुरू आहे का?*

पर्यावरण आघात अहवाल आणि जनसुनावणी झाली आहे का?

एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खननासाठी परवानग्या कोणत्या?

खनिकर्म व महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष का केले?शासनाच्या महसुलाची होत असलेली हानी कोण भरून काढणार?

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!