🛑 मळेवाड परिसरात पहिल्याच पावसात बीएसएनएल इंटरनेट सेवा गायब
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी, दि-०७:– मळेवाड परिसरात पहिल्याच पावसात बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून, यामुळे ग्राहक आणि व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना पहिल्याच जोरदार पावसाने मळेवाड परिसरातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएल चे ग्राहक ,व्यापारी नेटवर्क नसल्यामुळे हैराण झाले आहे.
पहिल्याच पावसानंतर मळेवाड परिसरातील बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे गायब झाले आहे.यामुळे इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे बँक व्यवहार, ऑनलाईन पेमेंट, आणि डिजिटल सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत.व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून दुकानदारांचे ऑनलाईन व्यवहार बंद पडल्याने स्थानिक बाजारपेठेतील व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे.आयटी क्षेत्रात घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इंटरनेट नसल्याने प्रचंड नुकसान होत आहे .
मळेवाड परिसरात दरवर्षी पावसाळा सुरू झाला की बीएसएनएलची सेवा विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. पावसाळ्यापूर्वी योग्य मान्सूनपूर्व कामे न केल्यामुळेच पहिल्याच पावसात ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सतत खंडित होणाऱ्या या सेवेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी आता बीएसएनएल सोडून इतर खाजगी कंपन्यांच्या सिम कार्डचा पर्याय निवडणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे या समस्येची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास येथील ग्राहक आक्रमक होत दुसरा अन्य पर्याय निवडणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मळेवाड परिसरातील इंटरनेट मोबाईल सेवा तात्काळ पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी मळेवाड आणि परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Posts by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

