🛑भाजपमध्ये महिला शक्तीचा स्फोट.
*🛑भाजपमध्ये महिला शक्तीचा स्फोट.*
*🛑मोहिनी मडगावकरांचा पदाचा राजीनामा;महिला जिल्हाध्यक्षा व सरचिटणीसांवर गंभीर आरोप.*
*🛑”एक व्यक्ती एक पद’चा नियम फक्त माझ्यासाठीच का?”; महेश सारंग हेच सूत्रधार असल्याचा आरोप;*
*🛑”माझ्याकडेही अनेक गोष्टींची माहिती, वेळ आल्यास बोलेन” असा इशारा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* सावंतवाडी भाजपमध्ये पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून भाजप महिला शहर मंडल अध्यक्षा तथा नगरपरिषद पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर या भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या इशाऱ्यावर काम करत असून त्यांच्या दबावामुळेच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मडगावकर यांनी “एक व्यक्ती एक पद” या न्यायाचा दाखला देत माझ्याकडे नगरसेविका आणि पर्यटन सभापती पद असल्याने महिला शहर मंडल अध्यक्ष पदाचा राजीनामा मागण्यात आला. मात्र जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांकडे दोन-दोन पदे असताना केवळ माझ्यावरच हा नियम लादला जात असल्याचा सवाल उपस्थित केला.
महेश सारंग हेच या सर्व घडामोडींचे सूत्रधार असल्याचा आरोप करत त्यांनी, “ते जशी चावी फिरवतात तशा महिला जिल्हाध्यक्षा बोलतात. शहराच्या राजकारणात एका बाहेरील व्यक्तीची एवढी ढवळाढवळ का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे अनेक महिला कार्यकर्त्या सक्रिय राजकारणापासून दूर राहत असल्याचाही दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी थेट इशाराही दिला. “माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. मात्र माझ्याकडेही अनेक गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे. वेळ पडल्यास मलाही बोलावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
पक्षातील वरिष्ठ नेते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे हे महिलांना सन्मान देणारे नेते आहेत. मात्र त्यांच्या नावाचा वापर करून स्थानिक पातळीवर कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्री अशा बाबींमध्ये हस्तक्षेप करणारे नाहीत, त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मडगावकर यांनी यावेळी आणखी एक गौप्यस्फोट करताना नगरसेविका पदाचे तिकीट देतानाही काही पदाधिकाऱ्यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा केला. मात्र जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने त्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरात केवळ दोन महिला पदाधिकारी होत्या. आज ५० हून अधिक महिला कार्यकर्त्या सक्रिय असून त्यामागे महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे योगदान असल्याचा दावा त्यांनी केला. नगराध्यक्ष, नगरसेविका निवडून आणण्यापासून ते विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत महिला मोर्चाने मोठे काम केले. तरीही कौतुक करण्याऐवजी पद सोडण्याचा दबाव आणला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आपण भाजप सोडत नसून केवळ महिला शहर मंडल अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहोत. नगरसेविका आणि पर्यटन सभापती म्हणून जनतेची सेवा सुरूच राहील तसेच पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्षा ज्योती मुद्राळे, सचिव नयना सावंत, मीना दाभोलकर, साक्षी गवस, मेघना साळगावकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
मोहिनी मडगावकर यांच्या या आरोपांमुळे सावंतवाडी भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड्यावर आला असून आगामी काळात या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स न्यूज :
“*मी पक्षातच राहणार, पण अपमान सहन करणार नाही!”*
मोहिनी मडगावकर यांनी स्पष्ट केले की, त्या भाजप सोडत नसून केवळ पदाचा राजीनामा देत आहेत. “पद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने बाजूला होणे मला मान्य आहे. माझे प्रेम पक्षावर आहे, पण अन्याय सहन करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

