कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑ओटवणेत शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण उत्साहात.

*🛑ओटवणेत शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण उत्साहात.*

 

*🛑आमदार डॉ.निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा; शिवप्रेमींची मोठी उपस्थिती*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* ओटवणे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. निलेश राणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती अधोरेखित केली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत आपण जन्मलो, हीच आपली भाग्याची गोष्ट आहे,” असे सांगत त्यांनी शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या मनोगतात ओटवणे गावाविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. व्यस्त वेळापत्रक असूनही या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी परिश्रम घेणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आणि ग्रामस्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी इतिहासाचा आढावा घेत शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे विवेचन केले. पत्रकार सीताराम गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला.

या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष दिनेश गावडे, पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर, सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, बजरंग दल संयोजक कृष्णा धुळप, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री विनायक रांगणेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सरपंच झेव्हीअर फर्नांडिस, रवींद्रनाथ गावकर, सगुण गावकर, बबलू गावकर, सोनू दळवी, रवींद्र म्हापसेकर, सरमळे सरपंच विजय गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, गुंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ शृंगारे व शुभम धुरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दशरथ शृंगारे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!