कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑महिला शहर मंडल अध्यक्षपदाचा मोहिनी मडगावकर यांचा राजीनामा.

*🛑महिला शहर मंडल अध्यक्षपदाचा मोहिनी मडगावकर यांचा राजीनामा.*

 

*🛑भाजप महिला जिल्हाध्यक्षा व जिल्हा सरचिटणीसांवर गंभीर आरोप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* भाजपच्या सावंतवाडी शहर महिला मंडल अध्यक्षा तथा नगरपरिषद पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर करताना भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आणि भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यावर गंभीर आरोप केले. “एक व्यक्ती, एक पद” या न्यायाचा दाखला देत माझ्याकडे नगरसेविका आणि सभापती पद असल्याचे कारण पुढे करून महिला शहर मंडल अध्यक्षपदाचा राजीनामा मागण्यात आला. मात्र पक्षातील अनेक नेत्यांकडे दोन-दोन पदे असताना केवळ माझ्यावरच अन्याय का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शहर उपाध्यक्षा ज्योती मुद्राळे, सचिव नयना सावंत, मीना दाभोलकर, साक्षी गवस, मेघना साळगावकर आदी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिला शहर मंडल अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मात्र आपण भाजपमध्येच राहून पक्षाचे सदस्य म्हणून तसेच नगरसेविका आणि पर्यटन सभापती म्हणून जनतेची सेवा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

मडगावकर यांनी आरोप करताना सांगितले की, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग हे या सर्व घडामोडीमागील सूत्रधार असून त्यांच्या सूचनेनुसार महिला जिल्हाध्यक्षा काम करत आहेत. शहरातील महिला संघटनेच्या कामात बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप वाढल्याने अनेक महिला कार्यकर्त्या सक्रिय होण्यास कचरतात. सातत्याने बदनामी करण्याचा प्रयत्न होत असून वेळ आल्यास आपल्यालाही अनेक गोष्टी उघड कराव्या लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

पक्षातील वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे हे महिलांना सन्मानाने वागणूक देतात. मात्र स्थानिक स्तरावरील काही पदाधिकारी महिलांना तुच्छ लेखत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात अनेक महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदे असताना केवळ माझाच राजीनामा का मागितला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामांचाही आढावा घेतला. स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरात महिला संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. शहरात ५० हून अधिक महिला कार्यकर्त्या सक्रिय झाल्या असून विविध निवडणुकांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लाडकी बहीण योजनेसह महिला मोर्चाचे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविले. एवढे काम करूनही कौतुकाऐवजी पद सोडण्याचा दबाव आणला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

नगरसेविका पदाचे तिकीट देताना देखील काही मंडळींनी आपले तिकीट कापण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. मात्र जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यामुळे आपण आजही जनतेची सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“आमचे प्रेम पक्षावर असून वरिष्ठ नेत्यांबद्दल आदर कायम आहे. भाजपमध्येच राहून कार्य करत राहणार आहोत. मात्र सन्मान राखण्यासाठी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सांगत मोहिनी मडगावकर यांनी आपला राजीनामा सादर केल्याची माहिती दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!