कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केर निडलवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी.

*🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केर निडलवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴 दोडामार्ग, दि- ०५:-* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री विठोबा कला क्रीडा युवा मंडळ, केर निडलवाडी यांच्या वतीने गावातील धनगर बांधवांना केसरी आंबा रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाबरोबरच धनगर बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला.

संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, यंदाचा हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. सदस्यांना देण्यात आलेल्या आंबा रोपांचे योग्य संगोपन झाल्यास भविष्यात त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ संबंधित कुटुंबांना होणार असून, त्यातून सदस्यांच्या आर्थिक बळकटीस हातभार लागणार आहे.

यावेळी धी सावंतवाडी धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्ष व विठोबा कला क्रीडा युवा मंडळाचे मार्गदर्शक श्री. नवल गावडे, श्री विठोबा कला क्रीडा युवा मंडळाचे अध्यक्ष अजित शिंदे, महिला बचत गट प्रमुख उत्कर्षा देसाई, गावचे वायरमन आबाभाई, मंडळाचे माजी अध्यक्ष अनंत झोरे, सचिव रूपेश डोईफोडे, खजिनदार दिवाकर गावडे, रामदास लांबर, भगवान गावडे, भगवान जंगले, ठको गावडे, लक्ष्मण लांबर, ललिता लांबर, नवनाथ घारे, राजेश गावडे, दीपक गावडे तसेच संस्थेचे इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. गावातील इतर ग्रामस्थांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी श्री. नवल गावडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. समाजहित, लोककल्याण आणि विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजासाठी अविरत कार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढती जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढता उकाडा आणि शेतीसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आज लावण्यात आलेली झाडे भविष्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यास, प्राणवायूचा पुरवठा वाढविण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून संस्थेच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!