कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मडुरा येथे स्ट्रीट लाईटच्या कामादरम्यान युवकाला विजेचा धक्का;कुटुंबीयांनी न्यायाची मागणी.

*🛑मडुरा येथे स्ट्रीट लाईटच्या कामादरम्यान युवकाला विजेचा धक्का;कुटुंबीयांनी न्यायाची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* मडुरा येथील रेडकरवाडी परिसरात ३० एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मडुरा देऊळवाडी (केरकरवाडी) येथील रहिवासी सौ. सेजल सागर केरकर यांनी आपल्या पती सागर केरकर यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेबाबत न्यायाची मागणी केली आहे.

सौ. केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मडुरा गावातील स्ट्रीट लाईटच्या खांबावरील बल्ब बदलण्यासाठी उपसरपंच कृष्णा (बाळू) गावडे यांनी सागर केरकर यांना खांबावर चढण्यास सांगितले. बल्ब बदलण्याचे काम सुरू असताना सागर केरकर यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते खांबावरून खाली कोसळले व बेशुद्ध झाले.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, ही घटना घडल्यानंतर त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जखमी सागर केरकर यांना गोवा येथील बांबोळी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच उपचारादरम्यान आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही मदत करण्यात आली नाही. घटनेनंतर संबंधितांनी रुग्णाची साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सध्या सागर केरकर यांना शरीराच्या उजव्या बाजूला, विशेषतः हात व पायात मुंग्या येण्याचा त्रास होत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. या अपघातामुळे कुटुंब मानसिक व आर्थिक अडचणीत सापडले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई व आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, उपसरपंच तसेच संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेची वस्तुस्थिती व जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने चौकशी करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.पीडित कुटुंबाने गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे न्यायासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!