🛑एक झाड आईच्या नावाने” की लाखो झाडांच्या कत्तलीवर पडदा? – डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सवाल
*🛑एक झाड आईच्या नावाने” की लाखो झाडांच्या कत्तलीवर पडदा? – डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सवाल*
*🛑वृक्षारोपण स्वागतार्ह, पण जैवविविध जंगलांची होत असलेली बेसुमार वृक्षतोड आणि शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर भाजपने भूमिका स्पष्ट करावी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०४:-* पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणाबाबत समाजात संवेदनशीलता वाढत असल्याचे स्वागत करताना, केवळ वृक्षारोपणाचे इव्हेंट करून पर्यावरण संवर्धनाचा दावा करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी मांडली आहे.
जनकल्याण अभियानांतर्गत “एक झाड आईच्या नावाने” या उपक्रमाद्वारे जिल्हाभरात ४० हजार झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भाजपने जाहीर केला आहे. हा उपक्रम राबविला जाईल आणि त्याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीही होईल, यात शंका नसल्याचे सांगतानाच डॉ. परुळेकर यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत.
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने समृद्ध जंगलांमध्ये सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच या वृक्षतोडीविरोधात भाजपचे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढाकार घेणार का, अशी विचारणाही त्यांनी केली.
याशिवाय प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग ज्या तेरा गावांतून जाणार आहे, त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीचा विचार केला जाणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामादरम्यान बांदा ते खारेपाटण या पट्ट्यात लाखो झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्या बदल्यात लावण्यात आलेल्या झाडांपैकी आज किती झाडे प्रत्यक्षात उभी आहेत, याचाही हिशेब जनतेसमोर यायला हवा, असे ते म्हणाले.
“वृक्षारोपण अत्यावश्यक आहे, मात्र अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या मोठमोठ्या वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केवळ झाडे लावण्याचे फोटोसेशन नको, तर विद्यमान जंगलांचे रक्षण करण्याची ठोस भूमिका घेतली पाहिजे,” असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

