🛑महाराष्ट्र चेंबर निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ला कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा जाहीर पाठिंबा.
*🛑महाराष्ट्र चेंबर निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ला कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा जाहीर पाठिंबा.*
*🛑उद्योगविकास व कोकणच्या प्रभावी प्रतिनिधित्वासाठी एकता पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा : मोहन होडावडेकर यांचे आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०३:-* महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राशी निगडित शंभर वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक येत्या ११ जून रोजी होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने एकता पॅनेलला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
यापूर्वीच चेंबरच्या अध्यक्षपदी तरुण, अभ्यासू आणि उद्योग क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या रविंद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र कोकण विभागातील काही पदांबाबत एकमत न झाल्याने निवडणूक होत असून विद्यमान अध्यक्ष रविंद्र माणगावे, माजी अध्यक्ष खुशालभाई पोंदार, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल लोढा आणि माजी कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकता पॅनेल निवडणूक मैदानात उतरले आहे.
एकता पॅनेलकडून कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदासाठी संतोष राणे हे उमेदवार आहेत. युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते बांबू उद्योगाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. तसेच गव्हर्निंग कौन्सिलसाठी नकुल पार्सेकर, राजन नाईक, मनोज वालावलकर, मिलिंद प्रभू, विजय केनवडेकर, पुंडलिक (विशाल) परब आणि कुणाल वरसकर हे उमेदवार रिंगणात आहेत.
कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष तथा उद्योजक मोहन होडावडेकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र चेंबरमध्ये कोकणचे सक्षम प्रतिनिधित्व अत्यंत आवश्यक आहे. एकता पॅनेलमधील सर्व उमेदवार अनुभवी, कार्यक्षम आणि विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक कामगिरी करणारे असल्याने सभासदांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे.
यावेळी असोसिएशनच्या बैठकीत एकता पॅनेलला अधिकृत आणि संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील उद्योग क्षेत्रात एकता पॅनेलच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

