कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नेमळेतील रस्त्यांची चाळण; ग्रामस्थांचा संताप अनावर!

*🛑नेमळेतील रस्त्यांची चाळण; ग्रामस्थांचा संताप अनावर!*

 

*🛑आठ जूनपर्यंत दुरुस्ती न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* नेमळे गावातील विविध वाड्यांना तसेच तळवडे, मळगाव, कमळेवीर, वेंगुर्ला आणि झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत ते दलित वस्ती तसेच पाटकरवाडी ते कमळेवीर-तळवडे या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून दररोज दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहन चालवावे लागत आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांतच शाळा सुरू होणार असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात वाहनांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात नेमळे ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी नेमळे ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास ८ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी उपसरपंच सखाराम राऊळ, एकनाथ राऊळ, विक्रम पांगम, मिलिंद नेमळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“रस्ते दुरुस्त करा, अन्यथा उपोषणाला सामोरे जा!” — नेमळे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!