🛑राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा झेंडा फडकला!
*🛑राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा झेंडा फडकला!*
*🛑बाळकृष्ण पेडणेकरची ठाणे, मुंबई येथील राष्ट्रीय रॅपिड रेटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी;रोख पारितोषिकाने गौरव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* ठाणे, मुंबई येथे विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे आणि ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने उल्लेखनीय कामगिरी करत ७३ वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल त्याला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
देशभरातील विविध राज्यांमधून तब्बल ४९८ खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ३१४ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा समावेश असल्याने स्पर्धेची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता अधिकच वाढली होती.
मुक्ताई ॲकेडमीचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू असलेल्या बाळकृष्ण पेडणेकरने नऊ फेऱ्यांपैकी पाच सामने जिंकत आणि दोन सामने बरोबरीत सोडवत एकूण सहा गुणांची कमाई केली. अत्यंत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत त्याने राष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले.
याच स्पर्धेत मालवण येथील व्हिज्युअली चॅलेंज्ड बुद्धिबळपटू मयुरेश परुळेकर यानेही उत्कृष्ट खेळ करत नऊ फेऱ्यांमध्ये चार विजय आणि एक बरोबरीसह साडेचार गुण मिळवले. विशेष म्हणजे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल २७ गुणांची वाढ झाली. तसेच मयुरेश मालवणकर यानेही स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या सर्व विद्यार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ. स्नेहा पेडणेकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाळकृष्ण पेडणेकर, मयुरेश परुळेकर आणि मयुरेश मालवणकर यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

