कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑केसरकरांनी आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा” : काँग्रेसचा हल्लाबोल.

*🛑केसरकरांनी आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा” : काँग्रेसचा हल्लाबोल.*

 

*🛑SIR प्रक्रियेच्या बैठकीनंतर सावंतवाडीत काँग्रेस आक्रमक; शालार्थ आयडी घोटाळा, मायनिंग माफिया, मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व कबुलायतदार जमीन प्रश्नांवर SIT चौकशीची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या अनुषंगाने सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडी येथील तालुका काँग्रेस कार्यालयात पार पडली. शासनाच्या BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी व मतदान केंद्रांवर BLA-2 नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक प्रश्नांवरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदारसंघातील

विकासकामांचा बोजवारा उडाला असून केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजनच; प्रत्यक्ष काम शून्य सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. भूमिपूजनाचे कार्यक्रमही झाले, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत एक वीटही रचली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना उपचारांसाठी गोवा किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागत असल्याचे काँग्रेसने म्हटले.

शालार्थ आयडी घोटाळा आणि खरात प्रकरणाची SIT चौकशी करा.

शालेय शिक्षण मंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या कथित शालार्थ आयडी घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच राज्यभर चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणातही निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका मांडण्यात आली. या दोन्ही प्रकरणांसह संबंधित आर्थिक व प्रशासकीय बाबींची उच्चस्तरीय SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

*कबुलायतदार जमीन प्रश्न अजूनही प्रलंबित*

आंबोली आणि चौकुळ परिसरातील कबुलायतदार जमीन प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो सोडवण्यात विद्यमान लोकप्रतिनिधींना अपयश आल्याचा आरोप काँग्रेसने केला. निवडणुकीत आश्वासने देऊन नंतर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही सांगण्यात आले.

*मायनिंग माफिया आणि बेकायदा उत्खननावर प्रश्नचिन्ह*

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात वाढलेल्या कथित बेकायदा उत्खनन, मायनिंग माफिया आणि अवैध धंद्यांबाबतही काँग्रेसने चिंता व्यक्त केली. आडाळी एमआयडीसी परिसरातील उत्खननामुळे शेतकरी आणि स्थानिकांचे नुकसान झाल्याचा दावा करत या प्रकरणांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

*जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप*

पाणी, रस्ते, आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांनी जनता त्रस्त असताना आमदारांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मतदारसंघाच्या विकासासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज असून जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी सांगितले.

लवकरच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत काँग्रेसतर्फे सनदशीर मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, बाळा धाऊसकर, रवींद्र म्हापसेकर, ॲड. समीर वंजारी, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, विधाता सावंत, गुणाजी गवस यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!