आनंदश्रय येथे आरोग्य तपासणी

*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴कसाल*

**रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल ‘ तर्फे आनंदाश्रय येथे आरोग्य तपासणी. व्हीलचेअर औषधौपचार भेट…*

समाजात मित्रत्व जपण्यासोबतच, एक सामाजिक दृष्टीकोन ठेवून आरोग्य, शिक्षण, धार्मिक कार्यक्रम व सार्वजनिक कार्यक्रमात ग्रामस्थांंसह सहभागी होऊन स्वच्छता अभियान राबविणे, दीनदुबळ्या तसेच अपंगत्व बांधवांना मदतीचा हात पुढे करुन जनसेवा करणे, व इतर क्षेत्रात काम करण्याचा मानस असल्याचे अणावयेथिल”आनंदाश्रय “मधील वृद्धांच्या आशीर्वादाने नव्याने सुरू करण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ सेंट्रल च्या पहिल्या उपक्रमात बोलताना भाग्य आपल्या क्लबला लाभले असे प्रतिपादन नुतन अध्यक्ष डॉ, प्रशांत कोलते यांनी केले.
कसाल, ओरोस, पंचक्रोशीत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे पहिलाच सामाजिक उपक्रम आनंदाश्रय, अणाव येथे पार पडला .यामध्ये 25 वृद्धांची मोफत जनरल आरोग्य तपासणी,औषधे, डायपर आणि व्हील चेअर देण्यात आले. डाॅ कोलते यांनी आनंदाश्रय येथील रुग्णांची यावेळी तपासणी केली व औषधौपचारासाठी मार्गदर्शनही केले. ,डाॅ सिद्धार्थ परब यांनी डेंटल चेकअप केले.
डॉक्टर कोलते म्हणाले जगभरामध्ये रोटरी इंटरनॅशनल च्या जवळपास तीन हजार पाचशे पेक्षा जास्त शाखा आहेत. रोटरी क्लब कुडाळच्या माध्यमातून रोटरीचे.गजानन कांदळगावकर व रोटरीच. प्रणय तेली यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल हा नुकताच स्थापन करण्यात आलाअसून पंचक्रोशीतील कसाल,ओरोस,रानबांबुळी,पडवे, सुकळवाड या जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत गावातील गरजूवंत व्यक्ती तसेच शालेय विद्यार्थी व आरोग्य तपासणी शिबिरे इतर सार्वजनिक क्षेत्रात रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहे असे डॉक्टर कोलते म्हणाले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष डाॅ प्रशांत कोलते ,सेक्रेटरी उदय जांभवडेकर,खजिनदार नवीन बांदेकर,रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने,सचिव अभिषेक माने,माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर ,राजन बोभाटे,शशिकांत चव्हाण ,प्रमोद भोगटे,तसेच रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे शंकरराव कोकितकर,अतुल बागवे, डाॅ सिद्धार्थ परब,समीर परब,सिद्धांत सावंत, अरूण मसुरकर,रविकमल डांगी, डाॅ विलास सावंत यांसह आनंदाश्रयचे बबनकाका परब ,व कोलते हाॅस्पिटल स्टॉफ, एकनाथ आचरेकर, सिद्धेश हिंदळेकर, हे उपस्थित होते.
तर रोटरीचे गजानन कांदळगावकर यांनी या उपक्रमांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आनंदाश्रय चे बबन (काका) परब यांनी आभार मानले.सूत्रसंचालन सेक्रेटरी उदय जांभवडेकर यांनी केले,तर आभार खजिनदार नवीन बांदेकर यांनी व्यक्त केले.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!